• Download App
    बीजिंग विंटर ऑलंपिक वर बहिष्कार घालणाऱ्या देशांना "किंमत" चुकवावी लागेल; चीनची धमकी । China warns, winter Olympics boycotting countries will have to pay the price

    बीजिंग विंटर ऑलंपिक वर बहिष्कार घालणाऱ्या देशांना “किंमत” चुकवावी लागेल; चीनची धमकी

    वृत्तसंस्था

    बीजिंग : चीनची राजधानी बीजिंग मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विंटर ऑलिंपिक वर अमेरिका ब्रिटन ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या चार देशांनी आत्तापर्यंत राजनैतिक बहिष्कार घातला आहे. या राजनैतिक बहिष्काराची किंमत त्यांना चुकवावी लागेल अशी धमकी चीनने दिली आहे. China warns, winter Olympics boycotting countries will have to pay the price

    ऑलिंपिक खेळांचा प्लॅटफॉर्म राजकीय कारणांसाठी वापरू नये, हा आंतरराष्ट्रीय संकेत आहे. परंतु चार देशांनी या संकेतांचा भंग केला आहे. त्याची राजनैतिक किंमत त्या देशांना चुकवावी लागेल, असे चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते वँन वेन वेनबिंग यांनी स्पष्ट केले. परंतु ही राजनैतिक किंमत नेमकी कोणती त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंधांवर नेमका काय परिणाम होईल याचा तपशील वेनबिंग यांनी दिलेला नाही.



    चीनमध्ये सातत्याने मानवाधिकाराचे उल्लंघन होत असते. धार्मिक अधिकारांवर ही मोठ्याप्रमाणावर बंधने आहेत. हे कारण देत ऑस्ट्रेलिया अमेरिका ब्रिटन आणि कॅनडा या चार देशांनी विंटर ऑलिंपिक वर बहिष्कार घातला आहे.

    China warns, winter Olympics boycotting countries will have to pay the price

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Indian Rupee : द फोकस एक्सप्लेनर : डॉलरच्या तुलनेत रुपया 96.14 वर, सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम, कशी ठरते चलनाची किंमत? वाचा सविस्तर

    Flex-Fuel Car : देशात फ्लेक्स-फ्यूल गाड्यांची लॉन्चिंग रखडली; ऑटो कंपन्या म्हणाल्या – आधी इंधन मिळावे, तेल कंपन्यांनी म्हटले – आधी गाड्या याव्यात

    राहुल गांधी आणि शरद पवारांमध्ये साम्य काय??; लाडक्या नेत्यांना मुख्यमंत्री पद देऊ शकले नाय!!