• Download App
    बीजिंग विंटर ऑलंपिक वर बहिष्कार घालणाऱ्या देशांना "किंमत" चुकवावी लागेल; चीनची धमकी । China warns, winter Olympics boycotting countries will have to pay the price

    बीजिंग विंटर ऑलंपिक वर बहिष्कार घालणाऱ्या देशांना “किंमत” चुकवावी लागेल; चीनची धमकी

    वृत्तसंस्था

    बीजिंग : चीनची राजधानी बीजिंग मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विंटर ऑलिंपिक वर अमेरिका ब्रिटन ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या चार देशांनी आत्तापर्यंत राजनैतिक बहिष्कार घातला आहे. या राजनैतिक बहिष्काराची किंमत त्यांना चुकवावी लागेल अशी धमकी चीनने दिली आहे. China warns, winter Olympics boycotting countries will have to pay the price

    ऑलिंपिक खेळांचा प्लॅटफॉर्म राजकीय कारणांसाठी वापरू नये, हा आंतरराष्ट्रीय संकेत आहे. परंतु चार देशांनी या संकेतांचा भंग केला आहे. त्याची राजनैतिक किंमत त्या देशांना चुकवावी लागेल, असे चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते वँन वेन वेनबिंग यांनी स्पष्ट केले. परंतु ही राजनैतिक किंमत नेमकी कोणती त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंधांवर नेमका काय परिणाम होईल याचा तपशील वेनबिंग यांनी दिलेला नाही.



    चीनमध्ये सातत्याने मानवाधिकाराचे उल्लंघन होत असते. धार्मिक अधिकारांवर ही मोठ्याप्रमाणावर बंधने आहेत. हे कारण देत ऑस्ट्रेलिया अमेरिका ब्रिटन आणि कॅनडा या चार देशांनी विंटर ऑलिंपिक वर बहिष्कार घातला आहे.

    China warns, winter Olympics boycotting countries will have to pay the price

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी