• Download App
    अफगाणिस्तानच्या राजकारणात चीनचा शिरकाव, तालिबानी गटांशी चर्चा केली सुरु |China taking interst in Afgan politics

    अफगाणिस्तानच्या राजकारणात चीनचा शिरकाव, तालिबानी गटांशी चर्चा केली सुरु

    विशेष प्रतिनिधी

    बीजिंग – अफगाणिस्तानमधून अमेरिकेची सैन्यमाघारी होत असताना चीन आणि अफगाणिस्तानची जवळीक वाढत आहे. तालिबान संघटनेच्या एका गटाने चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांची येथे भेट घेतली.China taking interst in Afgan politics

    मुल्ला अब्दुल घनी बरादर याच्या नेतृत्वाखालील या गटाने, अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कोणालाही करू दिला जाणार नाही, असे आश्वाीसन चीनला दिले. बरादर याने चीनला ‘विश्वा सू मित्र’ असेही संबोधले आहे.



    अफगाणिस्तान सरकारमध्ये पुढील काळात तालिबानचे वर्चस्व असणार हे स्पष्ट असून आताही देशातील निम्म्याहून अधिक जिल्हे त्यांच्याच ताब्यात आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबानी गटाचा हा चीन दौरा झाला आहे. चीनमधील शिनजिआंग प्रांतात उइगर मुस्लिमांमध्ये सरकारबद्दल असंतोष आहे.

    या समुदायातील ईस्ट तुर्कमेनिस्तान इस्लामिक मूव्हमेंट (ईटीआयएम) फुटीरतावादी गट अफगाणिस्तानला लागून असलेली सीमा ओलांडण्याची शक्यता चीनने व्यक्त केली आहे. मात्र, अफगाणिस्तानच्या भूमीचा इतरांना वापर करू दिला जाणार नाही, असे आश्वाीसन तालिबानने वँग यी यांना दिले आहे.

    पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महंमद कुरेशी यांनी तीन दिवसांपूर्वी वँग यी यांची भेट घेत, अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात संयुक्त कारवाई करण्याची घोषणा केली होती.

    China taking interst in Afgan politics

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी

    Disha Patani : दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणारे ठार; गाझियाबादेत एसटीएफने केले एन्काउंटर