• Download App
    Shanghai Cooperation Organization

    चीन पुरस्कृत शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा इजरायल वर एकतर्फी हल्लाबोल; पण भारताने काढला वेगळा सूर!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : इजराइल आणि इराण यांच्या संघर्षात चीन पुरस्कृत शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन या संघटनेने फक्त इजरायल वर एकतर्फी हल्लाबोल केला, पण भारताने मात्र वेळीच वेगळा सूर काढून फक्त इजरायलवर होणाऱ्या टीकेतून अंग काढून घेतले.

    आंतरराष्ट्रीय राजकारणात चीन इराणचा मित्र असल्यामुळे चीन पुरस्कृत शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन या संघटनेने इजरायलने इराण वर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. पण इराणने चालविलेल्या बेकायदा अणु कार्यक्रमाविषयी चकार शब्दही उच्चारला नाही. इजराइलने इराणवर हल्ला केला. त्यांची अण्वस्त्र केंद्रे उद्ध्वस्त केली. त्या पाठोपाठ इराणने देखील इजराइल वर हल्ला करून त्यांच्या नागरी वस्त्यांना टार्गेट केले. पण शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन या संघटनेने फक्त इजरायली हल्ल्यांचा निषेध केला.

    भारताने मात्र या एकतर्फी निषेधापासून अंतर राखले. इजराइल आणि इराण या दोन्ही देशांनी युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित केली पाहिजे. दोघांनी चर्चा सुरू केली पाहिजे, अशी भूमिका भारताने जाहीरपणे घेतली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इजराइल आणि इराण या दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करून भारताची भूमिका स्पष्टपणे सांगितली.

    चीन पुरस्कृत शांघाय को ऑपरेशन संघटनेने इस्रायलच्या निषेध करणारे पत्रक काढल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्वतंत्र पत्रक काढून भारताची स्वतंत्र भूमिका स्पष्ट केली.

    China-sponsored Shanghai Cooperation Organization’s unilateral attack on Israel

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    लाल्या म्हणून मनोज जरांगे यांनी उडवली राहुल गांधींची खिल्ली; मराठा आरक्षणावरून काँग्रेसची केली कोंडी!!

    Air Force chief : हवाई दल प्रमुख म्हणाले – भारतीय विमान पाडल्याचे दावे केवळ कथा; पाकिस्तानकडे पुरावे असतील तर दाखवावेत

    Army Chief : लष्करप्रमुख म्हणाले- पाकिस्तानला भूगोलावरून पुसून टाकू, सैनिकांना सांगितले – तयार राहा, देवाची इच्छा असेल तर लवकरच संधी मिळेल