विशेष प्रतिनिधी
बीजिंग : तैवान हा चीनचाच भाग असल्याचा चीन सरकारचा दावा असल्याने तैवानचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करणाऱ्यांना चीन सतत आपल्या कृतीतून इशारा देत असते. त्यामुळे तैवानला त्यांच्या स्वत:च्या नावाने कार्यालय उघडण्यास लिथुआनिआ देशाने परवानगी दिल्यानंतर चीनने त्यांना जबरदस्त दणका दिला आहे. लिथुआनियातील आपल्या राजदूताला त्यांनी माघारी बोलाविले असून बीजिंगमधील लिथुआनियाच्या प्रतिनिधीची हकालपट्टी केली आहे. China send strong signals to world on Taiwan issue
तैवान सध्या स्वायत्त असून त्यांचे अमेरिका आणि जपानसह अनेक देशांबरोबर संबंध आहेत. या देशांमधील त्यांची व्यापारी कार्यालये दूतावासाचेच काम पाहतात. मात्र, चीनच्या दबावामुळे तैवानशी स्वतंत्रपणे संबंध असणाऱ्या देशांची संख्या कमी होऊन केवळ १५ राहिली आहे. चीनच्या दबावामुळे अनेक ठिकाणी तैवानचा उल्लेख ‘चायनीज तैपेई’ असा केला जातो.
China send strong signals to world on Taiwan issue
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तराखंडच् दुर्गम खेड्पाड्यात मध्ये आता चक्क मोटारीतून होणार न्यायदान, ई-न्यायालयाचा देशातील पहिलाच प्रयोग
- देशातील सर्वांत श्रीमंत तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा सुब्बरेड्डी यांची निवड
- मदरशांसह सर्व धार्मिक अल्पसंख्याक शाळांना आरटीई कक्षेत आणण्याची केंद्राकडे शिफारस
- कर्नाटकात भाजप, संघ कार्यकर्त्यांवरील खटले सरकार मागे घेणार
- चीनने दोनदा scuttle केलेला सागरी सुरक्षेचा विषय भारताने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा समितीच्या अजेंड्यावर आणला कसा…?? वाचा…!!