• Download App
    चीनच्या २४० किलो वजनाच्या बग्गीची मंगळावरील मुशाफिरी वेगाने सूरू।China rover start journey on mars

    चीनच्या २४० किलो वजनाच्या बग्गीची मंगळावरील मुशाफिरी वेगाने सूरू

    विशेष प्रतिनिधी

    बीजिंग : मंगळाच्या पृष्ठभागावर मुशाफिरी करणारी जगातील दुसरी बग्गी चीनने ‘त्यानवेन-१’ या मंगळ मोहिमेद्वारे यशस्वीरीत्या उतरवली. ‘तियानवेन-१’ या मंगळयानातील ‘झुरोंग’ या बग्गीने (रोव्हर) मंगळावरील आपल्या प्रवासाला सुरवात केली आहे. चीनची राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था ‘सीएनएसए’ने यासंबंधी अधिकृत घोषणा केली आहे. China rover start journey on mars



    या बग्गीचे वजन २४० किलो असून तिला सहा चाके आहेत. २०० मिटर प्रती तास वेगाने ती मंगळावर धावू शकते. वाटेल आलेला २० ते ३० सेंटीमीटर उंचीचा अडथळा पार करते. या बग्गीचा कार्यकाळ सुमारे ९० मंगळावरील दिवस इतका असून मंगळाच्या पृष्ठभागाचे त्रिमितीय छायाचित्र घेतले आहे.

    मंगळाच्या उत्तर गोलार्धातअसलेल्या, लाव्हापासून बनलेल्या पठारावर ही बग्गी उतरवण्यात आली आहे. युटोपिया प्लॅनिटिया या नावाने हे पठार ओळखलं जाते. ‘लॅंडरला जोडून असलेल्या रॅंप वरून ‘झुरोंग’ बग्गी उतरली आणि तीने मंगळावरील लाल मातीला स्पर्श केला’, असे चीनच्या अवकाश संशोधन संस्थेने म्हटले आहे.

    China rover start  journey on mars

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार