• Download App
    चीनच्या मालवाहू यानाचे यशस्वी उड्डाण, अंतराळ स्थानकाला साहित्य पुरवठा करणार । China launches cargo rocket in space

    चीनच्या मालवाहू यानाचे यशस्वी उड्डाण, अंतराळ स्थानकाला साहित्य पुरवठा करणार

    वृत्तसंस्था

    बीजिंग : चीनच्या तियांगगॉंग अंतराळ स्थानकाला साहित्य पुरवण्यासाठी आणि अंतराळवीरांना मदत करण्यासाठी मालवाहू यानाने यशस्वी उड्डाण केले. तियानझोऊ-३ असे मालवाहू यानाचे नाव आहे. सुमारे सहा टन साहित्य घेऊन उड्डाण केलेले तियानझोऊ-३ हे यान तियांगगॉंग अंतराळ स्थानकावरील तिनाहे आणि तियानझोऊ-२ यांच्याशी संयोग करेल. China launches cargo rocket in space

    अंतराळस्थानकाची बांधणी आणि तंत्रज्ञान निश्चिाती टप्प्यांतील तियानझोऊची पाचवी अंतराळ मोहीम आहे. यानातून तीन अंतराळवीरांसाठीचे साहित्य, अतिरिक्त अंतराळ वेशभूषा, निर्मिती साहित्य आणि इंधनाचे वहन करण्यात येत आहे.



    शेनझोऊ-१३ चे पथक अंतराळ स्थानकावर सहा महिने राहण्याची शक्यता आहे. मागील अंतराळवीराच्या तुलनेत हा काळ दुप्पट असणार आहे. शेनझोऊ-१३ मोहिमेसाठी तीन सदस्यीय अंतराळवीरात एक महिला देखील असणार आहे. २००३ नंतर चीनने ११ जणांना अवकाशात पाठवले असून त्यापैकी केवळ दोनच महिलांचा लियू यांग आणि वांग यापिंग यांचा समावेश आहे.

    China launches cargo rocket in space

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Apple : अ‍ॅपलचे बाजारमूल्य पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्स पार; हे भारताच्या जीडीपीच्या बरोबर

    Siddaramaiah : सरकारी ठिकाणी RSS शाखा, बंदीच्या आदेशाला स्थगिती; कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सिद्धरामय्या सरकार खंडपीठात आव्हान देणार

    Delhi Police : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला दिल्लीतून अटक; अनेक वर्षांपासून गुप्तचर माहिती पाठवत होता