वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 3 वर्षांपासून बंद असलेल्या कैलास-मानसरोवर यात्रेसाठी चीनने व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्याचे नियम अतिशय कडक करण्यात आले आहेत. यासोबतच अनेक प्रकारच्या प्रवासाचे शुल्क जवळपास दुप्पट झाले आहे. आता भारतीय नागरिकांना प्रवासासाठी किमान 1.85 लाख रुपये खर्च करावे लागतील.China hikes fees for Kailas-Mansarovar Yatra, Indians now have to spend Rs 1.85 lakh
यात्रेकरूंनी नेपाळमधील एखादा कामगार किंवा मदतनीस मदतीसाठी सोबत ठेवला, तर 300 डॉलर्स म्हणजेच 24 हजार रुपये जादा पैसे द्यावे लागतील. या फीसला चीनने ‘ग्रास डॅमेजिंग फी’ म्हटले आहे. चीनचा असा तर्क आहे की, प्रवासादरम्यान कैलास पर्वताभोवती असलेले गवत खराब होते, ज्याची भरपाई प्रवासीच करतील.
काठमांडू बेसवर करावे लागणार युनिक आयडेंटिफिकेशन
चीनने काही नियम जोडले आहेत ज्यामुळे प्रक्रिया कठीण झाली आहे. उदाहरणार्थ, आता प्रत्येक प्रवाशाला त्याची खास ओळख काठमांडू बेसवरच करून घ्यावी लागेल. यासाठी बोटांचे ठसे आणि बुबुळांचे स्कॅनिंग केले जाणार आहे. परदेशी यात्रेकरूंना, विशेषत: भारतीयांच्या प्रवेशावर मर्यादा घालण्यासाठी कठोर नियम करण्यात आल्याचे नेपाळी टूर ऑपरेटर्सचे म्हणणे आहे.
कैलास यात्रा नेपाळसाठी मोठा व्यवसाय
नेपाळी टूर ऑपरेटर्ससाठी कैलास मानसरोवर यात्रा हा मोठा व्यवसाय आहे. नवीन नियम आणि वाढीव शुल्कांसह टूर ऑपरेटर आता रोड ट्रिपसाठी प्रति प्रवासी किमान 1.85 लाख रुपये आकारत आहेत, जे 2019 मध्ये रोड ट्रिप पॅकेजसाठी 90,000 रुपये होते. यात्रेसाठी 1 मेपासून नोंदणी सुरू झाली आहे. ऑक्टोबरपर्यंतच्या प्रवासाबाबत टूर ऑपरेटर सांगतात की, नवीन नियमांमुळे या वेळी लोकांचा कलही कमी दिसत आहे.
काय-काय आहेत नवीन नियम?
व्हिसा घेण्यासाठी यात्रेकरूंना प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागेल. ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजेच, प्रवाशाला आधी चिनी दूतावासाच्या आसपास जावे लागेल. त्यानंतर काठमांडू किंवा अन्य बेस कॅम्प येथे बायोमेट्रिक ओळख प्रक्रियेतून जावे लागेल.
आता व्हिसा मिळवण्यासाठी किमान ५ जणांचा ग्रुप असणे आवश्यक आहे. यापैकी चार लोकांना व्हिसासाठी अनिवार्यपणे स्वत: पोहोचावे लागेल.
तिबेटमध्ये प्रवेश करणार्या नेपाळी कामगारांना 300 डॉलर ‘ग्रास डॅमेजिंग फी’ म्हणून भरावे लागतील. अखेर हा खर्च यात्रेकरूलाच सोसावा लागणार आहे. कारण, फक्त प्रवासी कामगारांना मार्गदर्शक, मदतनीस, कुली किंवा स्वयंपाकी म्हणून घेऊन तिबेटमध्ये प्रवेश करतात.
तुमच्यासोबत कामगार ठेवण्यासाठी 15 दिवसांसाठी 13,000 रु. प्रवासाचे शुल्कही घेतले जाईल. पूर्वी ते फक्त 4,200 रुपये होते.
हा दौरा करणाऱ्या नेपाळी कंपन्यांना चीन सरकारकडे 60,000 डॉलर जमा करावे लागतील. यातील अडचण अशी आहे की नेपाळी ट्रॅव्हल एजन्सींना परदेशी बँकांमध्ये पैसे जमा करण्याची परवानगी नाही. अशा स्थितीत हे शुल्क कसे हस्तांतरित केले जाईल, याबाबतची परिस्थिती स्पष्ट करण्यात आलेली नाही.
China hikes fees for Kailas-Mansarovar Yatra, Indians now have to spend Rs 1.85 lakh
महत्वाच्या बातम्या
- ट्विटरवर लवकरच करता येईल व्हिडिओ-ऑडिओ कॉल, एलन मस्क यांची घोषणा, नंबरची एक्सचेंज न करता बोलू शकाल
- धर्माशी संबंधित राजकीय पक्षांच्या नावावर सुनावणी, दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राकडून 4 आठवड्यांत मागवले उत्तर
- सत्तासंघर्षावर आज निकाल, सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठातील युक्तिवाद 16 मार्चला झाला होता पूर्ण; राज्यपालांचा आदेश रद्द होणार का? वाचा सविस्तर
- बँकांमध्ये 35,000 कोटींच्या ठेवी पडून, दावा करणारा कोणीही नाही; केंद्र सरकार आता अशा प्रकारे करणार परत, योजना तयार