• Download App
    चिनी अर्थव्यवस्थेचा बोजवारा; देशावर मंदीचे मळभ!! china economy : The burden of the Chinese economy

    china economy : चिनी अर्थव्यवस्थेचा बोजवारा; देशावर मंदीचे मळभ!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जगभरात विस्तारवादाचा धुमाकूळ घालणाऱ्या चिनी अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्या देशातल्या औद्योगिक उत्पादन क्षेत्रावर मंदीचे दाट मळभ पसरले आहे. china economy : The burden of the Chinese economy

    चीनची अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या अनेक कंपन्या चीन सोडून जात असल्याने जुलै 2023 मध्ये निर्यातीतली वार्षिक घट तब्बल 14.5% पोहोचली आहे. जगातल्या मध्यम आणि गरीब देशांना कर्जाच्या कचाट्यात अडकविणाऱ्या चीनबद्दल कोणत्याही देशाला सहानुभूती उरलेली नाही.

    चीनची अर्थव्यवस्था केवळ निर्यातीवरच बांधली गेल्याने तिचा डोलारा सावरणे तिथल्या कम्युनिस्ट सरकारला कठीण जात आहे. युरोपसह पश्चिम देशांकडील मागणी कमी होते तेव्हा चीनला त्रास होतो. यामुळे चलनवाढ होते. आज पाकिस्तान आणि अन्य इस्लामी देश प्रचंड महागाईच्या ओझ्याखाली दबले आहेत. चीनमध्ये देखील महागाईने उच्चांक गाठला आहे. कारण लोकांकडे पैसे नाहीत आणि निर्यात कमी झाल्यामुळे पुरवठा अधिक होतो. चीन देखील याच आर्थिक चक्रव्यूहात अडकला आहे.

    चीनमधले उत्पादन क्षेत्र, पायाभूत सुविधा क्षेत्र, बांधकाम क्षेत्र मंदीच्या आवर्तात सापडले आहे. चीनमध्ये बेरोजगारीच्या पातळीत विक्रमी वाढ झाली आहे.

    एकाच वेळी चीनची निर्यात घसरली आणि देशांतर्गत मागणी घसरल्याने व्यवसाय बंद झाले आणि त्यामुळे पत वाढ 2009 पासून सर्वात कमी झाली. हातात पैसा नसल्यामुळे, लोक मालमत्तेत गुंतवणूक करत नाहीत. परिणामी अनेक मोठे मालमत्ता विकासक डिफॉल्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि काहींनी दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. लाखो रिकाम्या फ्लॅट्स म्हणजे भूतांचे शहर आणि शेवटी डॉलरच्या तुलनेत युआनला 16 वर्षांच्या नीचांकी पातळीवर नेले आहे.

    या पार्श्वभूमीवर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे दक्षिण आफ्रिकेत ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले आहेत. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत त्यांची द्विपक्षीय बातचीत होईल की नाही, याविषयी शंका आहे.

    china economy : The burden of the Chinese economy

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!