वृत्तसंस्था
बीजिंग : भारत सीमेवर तणाव निर्माण करणाऱ्या चीनने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची दुसऱ्यांदा चाचणी केली. अण्वस्त्र डागण्यास सुपरसॉनिक क्षेपणास्त्र सक्षम असल्याचे सूत्राने सांगितले आहे. हे क्षेपणास्त्र पृथ्वीवरून कोणत्याही हवाई संरक्षण यंत्रणेला भेदू शकते. चीनच्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राला रोखण्याची क्षमता अमेरिकेसह कोणत्याच देशाकडे नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. China did hypersonic test sucessfully
चीनने सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी तीन महिन्यापूर्वी १३ ऑगस्ट रोजी केल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्या चाचणीतही ‘हायपरसॉनिक ग्लाइड व्हेईकल’ चा वापर करण्यात आला आहे. यास चीनने लॉंग मार्च रॉकेटच्या मदतीने अंतराळात पाठवले होते. या क्षेपणास्त्राने पृथ्वीला प्रदक्षिणा घातली आणि निश्चिात केलेल्या स्थानावर आवाजापेक्षा अधिक वेगाने हल्ला केला. या चाचणीला चीनने दुजोरा दिला आहे. परंतु हे क्षेपणास्त्र ‘सिव्हिलियन स्पेसक्राफ्ट’ असल्याचा दावा चीनने केला आहे. दुसरीकडे जगभरातील तज्ञांनी या चाचणीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या क्षेपणास्त्रातून अण्वस्त्र वहन करता येऊ शकते आणि कोणतीही भक्कम संरक्षण यंत्रणा देखील भेदण्यास सक्षम आहे.