• Download App
    चीनचा खोडसाळपणा, अरुणाचलमधील १५ ठिकाणांची नावे चीनने बदलली|China changed the names of 15 places in Arunachal Pradesh

    चीनचा खोडसाळपणा, अरुणाचलमधील १५ ठिकाणांची नावे चीनने बदलली

    विशेष प्रतिनिधी

    बीजिंग : चीनने पुन्हा एकदा खोडसाळपणा केला असून भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेश राज्यातील आणखी पंधरा ठिकाणांचे मानकीकरण केले आहे. अरुणाचल प्रदेश म्हणजे दक्षिण तिबेट असल्याचा चीनचा दावा आहे.China changed the names of 15 places in Arunachal Pradesh

    या माध्यमातून चीन अरुणाचल प्रदेशावरील आपला दावा आणखी मजबूत करून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.सरकारी ग्लोबल टाइम्सने गुरुवारी दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने बुधवारी या पंधरा ठिकाणांची नावे चिनी अक्षरे, तिबेट आणि रोमन वर्णमालेनुसार केली आहेत.



    अरुणाचल प्रदेशचे नाव चीनसाठी झंगनान आहे. भौगोलिक नावासंबंधी चीनच्या मंत्रिमंडळाने जारी केलेल्या नियमांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. तंतोतत रेखांश आणि अक्षांश देण्यात आलेल्या या पंधरा ठिकाणांत आठ निवासी ठिकाणे, चार पर्वत, दोन नद्या आणि एका खिंडीचा समावेश आहे.

    चीनने यापूर्वीही अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांच्या नावांचे मानकीकरण केले होते. २०१७ मध्ये सहा ठिकाणांच्या नावांचे मानकीकरण केले होते. अरुणाचल प्रदेश दक्षिण तिबेट असल्याचा चीनचा खोडसाळपणा सातत्याने आहे. भारताने चीनचा हा दावा फेटाळत अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ठणकावून सांगितले आहे.

    भारत आणि चीनदरम्यान ३,४८८ किलोमीटरच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवरून वाद आहे. सीमावादावरून दोन्ही देशांदरम्यान हिंसक घटना घडलेल्या आहेत. तथापि, दोन्ही देश वाटाघाटींच्या माध्यमातून सीमावादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

    China changed the names of 15 places in Arunachal Pradesh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची