• Download App
    चीनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यापुढे अडचणींचा डोंगर, निर्बंधांमुळे मिळेना प्रवासाची संधी|China bans for students travelling

    चीनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यापुढे अडचणींचा डोंगर, निर्बंधांमुळे मिळेना प्रवासाची संधी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : चीनमधील विविध विद्यापीठांमध्ये २३ हजार भारतीय विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी २१ हजार विद्यार्थी ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेत आहेत. विदेशी विद्यार्थ्यांना परतण्याची चीन सरकारकडून परवानगी मिळत आहे, मात्र भारतामध्ये संसर्गाची दुसरी लाट आल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.China bans for students travelling

    चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेले आणि सुटी असल्याने गेल्या वर्षीच्या सुरुवातीला मायदेशी आलेले हजारो भारतीय विद्यार्थी अद्यापही घरीच अडकून पडले आहेत. अनेक महिने होऊन गेले तरी संसर्गाच्या स्थितीमुळे लागू केलेले आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध दूर होण्याची चिन्हे नसल्याने त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.



    हिवाळ्याच्या सुटीमुळे चीनमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी भारतात आले होते. त्याच वेळेस कोरोना संसर्गाचा चीनमध्ये आणि नंतर जगभरात उद्रेक झाल्याने सर्वच देशांनी आपापल्या सीमा बंद केल्या. त्यामुळे हे विद्यार्थी मायदेशातच अडकून पडले आहेत.

    त्यांचे ऑनलाइन वर्ग सुरु असले तरी वैद्यकीय शिक्षण घेताना अत्यावश्य क असलेल्या प्रॅक्टिकल वर्गांपासून मात्र ते वंचित रहात आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या भवितव्याबद्दल चिंता वाटत असून ते चीनमधील आपापल्या महाविद्यालयांमध्ये जाण्यास उत्सुक आहेत.

    China bans for students travelling

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक