प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनकडून मोठा सायबर धोका निर्माण झाला आहे. यात सर्वसामान्यच नव्हे तर लष्कराचे लोकही टार्गेटवर आहेत. चीनचे डेटिंग, चॅटिंग, ट्रेडिंग आणि लोन अॅप्स ही नवे शस्त्रे ठरली आहेत. अॅप स्टोअरवर 35 आणि Google Play वर 250 पेक्षा जास्त बनावट अॅप सक्रिय आहेत. भारत सरकारने 2020 पासून 232 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे, परंतु 300 हून अधिक अॅप्स देशात परत आले आहेत.China bans 232 apps, 300 new ones run by proxy from Hong Kong
असे दिसते की हे अॅप्स हाँगकाँग, व्हिएतनाम, सिंगापूर, इंडोनेशियातील आहेत, परंतु प्रत्यक्षात चिनी कंपन्या ते प्रॉक्सी लोकेशन्सवरून चालवत आहेत.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, तज्ज्ञांच्या मदतीने या अॅप्सचा गुप्तचर अहवाल तयार करण्यात आला असून, तो सरकारला पाठवला जाणार आहे. या अॅप्सवरून ऑनलाइन वेश्याव्यवसायही केला जात आहे आणि लहान शहरे आणि खेड्यातील उच्चभ्रू कुटुंबातील मुली आणि महिला जाळ्यात अडकत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मनोरंजनाच्या नावाखाली ते या सोशल अॅप्समध्ये सहभागी होतात. मग त्यांना बोलण्याच्या आणि भेटण्याच्या ऑफर मिळू लागतात. या अॅपमध्ये महिला/ मुलींना पैसे कमावण्याच्या ऑफर दिल्या जातात. एखाद्या दीर्घ चॅटिंग करण्याच्या बदल्यात त्यांना 30 ते 40 हजार रुपये सहज मिळतात. याशिवाय युझर्सनी त्यांना स्टार रेटिंग दिले तर त्याबद्दल्यात त्यांना प्रत्येक वेळेला 500 रुपयेही मिळतात, असा दावा केला जात आहे.
कोणते आहेत अॅप, चीनच्या सर्व्हरवर कसा जातो डेटा
5 अॅपसह 13.5 कोटी लोकांचा डेटा, बनावट प्रमाणपत्रासह मुथूटसारखे अॅप, फायनान्स कंपनी बनली, ज्यावर सरकारने बंदी घातली, UCam च्या नवीन आवृत्तीवर 10 कोटी युझर्स आहेत.
किती लोकांचा अॅप डेटा
बोलोजी प्रो 1 कोटींहून अधिक युझर्स, चमेट 1 कोटींहून अधिक युझर्स, वाका प्ले 50 लाखांहून जास्त युझर्स, ब्युटीप्लस 1 कोटींहून अधिक युझर्स, यूकॅमपेक्षा 10 कोटींहून जास्त युझर्स सक्रिय आहेत.
China bans 232 apps, 300 new ones run by proxy from Hong Kong
महत्वाच्या बातम्या
- The Kerala Story : लव्ह जिहाद हा तर हिंदु आणि ख्रिस्ती महिलांच्या गर्भावरील दहशतवादी हल्ला!!
- भावनेच्या भरात अंकुश काकडे बोलून गेले, असे पवार साहेब निर्णय मागे घ्या अन्यथा खेड्यातील लोक आत्महत्या करतील!!
- पवारांच्या निर्णयामागे घरातलेच असेल भांडण, तर बाहेरच्यांशी लढायला कशी मिळेल ताकद??
- Karnataka Election : ‘’आधी प्रभू श्रीरामाची अडचण होती आणि आता…’’ काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा!