• Download App
    मुलांचे लसीकरण डिसेंबरमध्ये?, राज्य बालरोग टास्क फोर्सला अपेक्षा|Child vaccination starts from Dec.

    मुलांचे लसीकरण डिसेंबरमध्ये?, राज्य बालरोग टास्क फोर्सला अपेक्षा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – राज्यभरात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीस सुरू होऊ शकते, अशी शक्यता राज्य बालरोग टास्क फोर्सकडून व्यक्त करण्यात आली आहे.शहरातील बहुसंख्य लोकांनी कोविड लशीचा पहिला डोस घेतला आहे.Child vaccination starts from Dec.

    त्यामुळे आता लहान मुलांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांच्या लशीची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. या वर्षाच्या अखेरीस किमान दोन लशी मुलांसाठी उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.’ तसेच लसीकरण सुरू झाल्यानंतर प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या तसेच इतर व्याधी असणाऱ्या मुलांना प्राधान्य द्यायला हवे.



    कारण अशी मुले संक्रमणाच्या दृष्टीने अधिक संवेदनशील असतात असे तज्ञांनी सांगितले. सध्या झायकोव्ह डी आणि झायडस या दोन लशींचे क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत; तर राज्यात १२ ते १८ वयोगटातील १० लाख मुले आहेत. जे जे रुग्णालयातील ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञांनीदेखील केंद्र सरकारने तातडीने मुलांसाठी लस आणावी असे म्हटले आहे.

    Child vaccination starts from Dec.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राहुल गांधींना प्रत्युत्तर देताना अमित शाहांनी लोकसभेत वाचून दाखविली भाजप हरल्याची यादी!!

    Anmol Ambani : अनिल अंबानींनंतर मुलगा अनमोलवर FIR; युनियन बँकेकडून ₹228 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

    India Aging : 2036 पर्यंत प्रत्येक 7 पैकी 1 भारतीय ज्येष्ठ नागरिक असेल; केंद्रीय मंत्री म्हणाले- लोकसंख्या वेगाने वृद्ध होत आहे