• Download App
    गांबिया, उजबेकिस्तानात बालकांचे मृत्यू; तपासापूर्वीच भारतीय कफ सिरप वर दोषारोपाचे जयराम रमेश यांचे ट्विट Child deaths in Gambia, Uzbekistan; Jairam Ramesh's tweet blaming Indian cough syrup before investigation

    गांबिया, उजबेकिस्तानात बालकांचे मृत्यू; तपासापूर्वीच भारतीय कफ सिरप वर दोषारोपाचे जयराम रमेश यांचे ट्विट

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : गांबिया आणि उझबेकिस्तान या दोन देशांमध्ये बालकांचे मृत्यू हे भारतीय बनावटीच्या कफ सिरप मुळे झाले नसल्याचा खुलासा दोन्ही देशांनी केला आहे, तरी देखील काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी भारतीय कफ सिरप जीवघेणे आहे. पंतप्रधान मोदींनी भारतीय फार्मासिटिकल कंपन्यांना लगाम घालावा आणि मेड इन इंडियाच्या गप्पा मारणे बंद करावे, अशा आशयाचे ट्विट केले आहे. पण दोन्ही देशातील मृत्यू संदर्भात जागतिक आरोग्य संघटना तपास करत आहे. त्याआधीच रमेश यांनी भारतीय कफ सिरप वर दोषारोप केला आहे. Child deaths in Gambia, Uzbekistan; Jairam Ramesh’s tweet blaming Indian cough syrup before investigation

    या संदर्भातली वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे, हे गांबिया देशाने स्पष्ट केले आहे. गांबिया या आफ्रिकन देशात 70 बालकांचा मृत्यू झाला आहे. कफ सिरप सेवनामुळे हा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत होते. या संदर्भातली चौकशी आणि तपास अजून सुरू आहे. पण त्याच वेळी गांबिया देशाने अधिकृतरित्या कफ सिरप डोस जास्त प्रमाणात घेतला गेल्याने कदाचित हृदयावर परिणाम होऊन बालकांचा मृत्यू झाला असावा, असे नमूद केले आहे.

    त्याच वेळी उजबेकिस्तानमध्ये 17 बालकांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने उजबेकिस्तानशी संपर्क साधून तिथला डेटा मागविला आहे. मात्र, यातली कोणतीही वस्तुस्थिती न समजून घेता जयराम रमेश यांनी बिनदिक्कतपणे मेड इन इंडिया कफ सिरपवर गांबिया आणि उजबेकिस्तान मधल्या बालकांच्या मृत्यूचे खापर फोडले आहे.

    या संदर्भात भाजपचे सोशल मीडिया प्रमुख अमित मालवीय यांनी देखील प्रत्यक्ष ठोस पुरावे नसताना जयराम रमेश केवळ मोदी द्वेषाने मेड इन इंडिया संकल्पनेची खिल्ली उडवत असल्याची टीका केली आहे.

    भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील या संदर्भातली वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवली असून गांबिया या देशाने जे म्हटले आहे, त्याला दुजोरा दिला आहे. त्याचबरोबर उजबेकिस्तान देशात जे बालकांचे मृत्यू झाले, त्या संदर्भातला अहवाल भारतीय दूतावासाने मागितला असल्याचे देखील परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

    भारतात नोएडा मध्ये प्लांट असलेली कंपनी मेरियन बायोटेक कंपनीचे हे कप सिरप असल्याचे सांगण्यात येते. मात्र कंपनीने देखील या संदर्भात खुलासा केला असून गेली 10 वर्षे औषधांच्या निर्मितीत ही कंपनी आहे. या कफ सिरपच्या उत्पादनात कोणतीही खोट नसल्याचा खुलासा कंपनीने केला आहे, तर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी संबंधित कंपनीच्या कफ सिरपचे नमुने चंदिगड मधल्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत तपासणी पाठवले आहेत. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, असे नमूद केले आहे

    Child deaths in Gambia, Uzbekistan; Jairam Ramesh’s tweet blaming Indian cough syrup before investigation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती