• Download App
    पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज दाखल करताना, 12 राज्यांचे मुख्यमंत्री असणार हजर Chief Ministers of 12 states will be present when Prime Minister Modi files his nomination papers

    पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज दाखल करताना, 12 राज्यांचे मुख्यमंत्री असणार हजर

    भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह एनडीएच्या मित्र पक्षांचे प्रमुखही असणार

    विशेष प्रतिनिधी

    वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (14 मे) उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करणार आहेत. पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 2014 आणि 2019 मध्ये ते येथून खासदार म्हणून निवडून आले होते. भाजपही पंतप्रधान मोदींच्या उमेदवारीबाबत कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. त्यासाठी भाजपकडून ठोस तयारी करण्यात आली आहे. Chief Ministers of 12 states will be present when Prime Minister Modi files his nomination papers

    मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल होताना जवळपास डझनभर राज्यांचे मुख्यमंत्र्यांसह मित्र पक्षाच्या प्रमुखांची उपस्थिती असणार आहे. याशिवाय भाजप आणि एनडीएचे अनेक नेते उमेदवारी यावेळी हजर राहणार आहेत. मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासा कोणते VVIP साक्षीदार असतील हे जाणून घेऊया.



    मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची उपस्थिती असणार आहे.

    याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेही असणार आहेत. तसेच एनडीएच्या मित्रपक्षांचे नेतेही सहभागी होणार आहेत. यामध्ये लोकदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंत चौधरी, एलजेपी प्रमुख चिराग पासवान, अपना दल (एस) अध्यक्षा अनुप्रिया पटेल, एसबीएसपी अध्यक्ष ओमप्रकाश राजभर, जीतन राम मांझी, टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू हेही उपस्थित राहणार आहेत.

    Chief Ministers of 12 states will be present when Prime Minister Modi files his nomination papers

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य