• Download App
    'मुख्यमंत्री ठाकरे, तुम्हाला लाज वाटली पाहिजे!' लोकल प्रवासात झालेल्या कारवाईमुळे महिलेचा संताप, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  Chief Minister, you should be ashamed!  Woman angry over action on local travel video goes viral on social media

    ‘मुख्यमंत्री ठाकरे, तुम्हाला लाज वाटली पाहिजे!’ लोकल प्रवासात झालेल्या कारवाईमुळे महिलेचा संताप, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

    अनेकजण जुगाड जमवून लोकलने प्रवास करत आहेत. अशा लोकांना तपासणीत पकडल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होते. त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. असाच प्रवास करणाऱ्या महिलेला तिकीट तपासणाऱ्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. दंड भरण्यासाठी माझ्याजवळ ५०० रुपये नाहीत, असे तिने सांगितले. हे सर्व फेसबुक लाइव्ह केले. तिचा हा जवळजवळ अर्ध्या तासाचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये महिलेने ‘मुख्यमंत्री, तुम्हाला लाज वाटली पाहिजे’ असे म्हणत सरकारने लोकलच्या प्रवासावर घातलेल्या निर्बंधांचा निषेध केला. Chief Minister, you should be ashamed!  Woman angry over action on local travel video goes viral on social media


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेणाऱ्यांना लोकलच्या प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. दोन डोस घेणाऱ्यांना १५ ऑगस्टपासून लोकल ट्रेनने प्रवास करता येणार आहे. असे असले तरी अनेकजण जुगाड जमवून लोकलने प्रवास करत आहेत. अशा लोकांना तपासणीत पकडल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होते. त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो.

    असाच प्रवास करणाऱ्या महिलेला तिकीट तपासणाऱ्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. दंड भरण्यासाठी माझ्याजवळ ५०० रुपये नाहीत, असे तिने सांगितले. हे सर्व फेसबुक लाइव्ह केले. तिचा हा जवळजवळ अर्ध्या तासाचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये महिलेने ‘मुख्यमंत्री, तुम्हाला लाज वाटली पाहिजे’ असे म्हणत सरकारने लोकलच्या प्रवासावर घातलेल्या निर्बंधांचा निषेध केला.

    मला सगळ्यांनी पैसे द्या…

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील या व्हायरल व्हिडीओमध्ये संबंधित महिलेकडे तिकीट असूनही ती अत्यावश्यक सेवेत किंवा ज्यांना ट्रेनने प्रवासाची परवानगी देण्यात आलीय अशा व्यक्तींमध्ये मोडत नसल्याने तिला ५०० रुपये दंड भरण्यास सांगण्यात आलं. मात्र, या महिलेने दंड भरण्यास नकार देत तुम्ही माझ्यावर कारवाई करा, असं आव्हान दिलं.

    “माझ्याकडे ५०० रुपये नाहीयत,” असं म्हणत नंतर ही महिला लाइव्ह व्हिडीओमध्येच आजूबाजूच्या प्रवाशांकडे, “मला पैसे द्या सगळ्यांनी माझ्याकडे पैसे नाहीयत,” असं म्हणू लागली. त्यानंतर एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने, “मॅडम तुम्ही शूट करू शकत नाही” असं सांगितल्यानंतर या महिलेने, “तुम्ही माझे हक्क काढून घेऊ शकत नाही,” असं ठाणकावत फेसबुक लाइव्ह सुरूच ठेवलं.

     

    ठाकरे सरकारचा निषेध..

    “माझ्याकडे ५०० रुपये नाहीत माझ्यावर कारवाई करा. मला किती वेळ बसवायचंय ते बसवा. आता तर मी मास्क पण नाही लावणार. त्याचा पण दंड मी भरणार नाही,” असं पुढे ही महिला म्हणाली. त्यानंतर अगदी ओरडून तिने, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ऐकावं की हा महिलांवर होणार अत्याचार आहे. माझ्याकडे पैसे नाहीत, मी दंड भरणार नाही. माझ्याकडे पैसे नाहीत या सरकारने माझ्यावर कारवाई करावी. या सरकारचा निषेध आहे. उद्धव ठाकरेंचा पण निषेध आहे. अशाप्रकारे महिलांना वेठीस धरणे चुकीचं आहे. आम्ही नोकरी नाही केली तर पैसे आणणार कुठून?,” असा सवालही तिने उपस्थित केला.

    “कोरोनाने मेली तरी चालेल मी.”

    “माझ्यावर करा कारवाई न्या कोणत्या तुरुंगात न्यायचं आहे तिकडे. मी तिकीटाशिवाय प्रवास करत नाहीय. कोणत्या नियमाखाली कारवाई करता बघू दे,” असं म्हणत ही महिला रेल्वे स्थानकावरील टीसी ऑफिसमध्ये जाऊन बसली. “या सरकारचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा धिक्कार आहे. मुख्यमंत्री तुम्हीच बघा ही परिस्थिती. तुम्ही प्रेमाने बोलताय ना, गोड बोलताय ना मग सांगा मला की माझ्याकडे दंडाचे पैसे नाहीत तर मी ते भरणार कुठून. माझ्याकडे मास्कच्या दंडाचे पैसेही नाहीत भरायला. बघू द्या माझ्यावर किती केसेस होतात,” असं ही महिला बोलताना दिसत आहे. “करोनाने मेली तरी चालेल मी मास्क नाही लावणार. करोनाचं सर्व थोतांड आहे. मी कॅमेरा सुरु ठेवणार तुम्ही कारवाई करा,” असं आव्हानही या महिलेने पोलीस कर्मचाऱ्यांना केलं.

    “तरी लाज वाटू दे उद्धवसाहेबांना”

    “तुम्ही आरडाओरड केल्याने तुम्हाला त्रास होईल”, असं या महिलेला सांगितल्यानंतर “होऊ द्या मला त्रास. मला त्रास झाल्याने महाराष्ट्रातील इतर महिलांना कमी त्रास होईल,” अशा तिने ओरडून उत्तर दिलं. “तुम्हाला माहितीय बाहेर काय अवस्था आहे. तुम्हाला पगार मिळाला या काळामध्ये, पण लोकं बाहेर बिनपैशाचे मेले. अहो करोना असाच राहणार आहे. ५०० रुपये दंडाच्या नावाखाली सरकार पैसे लुटतंय,” असा आरोपही या महिलेने केला. “स्त्रियांचा संताप बघून तरी लाज वाटू दे उद्धवसाहेबांना,” असंही ही महिला या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे. हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला असून आतापर्यंत वेगवेगळ्या पेजवरून तो शेअर करण्यात आलेला आहे.

    Chief Minister, you should be ashamed!  Woman angry over action on local travel video goes viral on social media

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र