• Download App
    माफिया अतिकने बळकवलेल्या जमिनीवर बांधलेले फ्लॅट मुख्यमंत्री योगींनी गरजूंना केले सुपूर्द! Chief Minister Yogi handed over the flats built on the land seized by mafia Atik to the needy

    माफिया अतिकने बळकवलेल्या जमिनीवर बांधलेले फ्लॅट मुख्यमंत्री योगींनी गरजूंना केले सुपूर्द!

    आमचे सरकार गरिबांच्या पाठीशी उभे असल्याचेही योगींनी सांगितले.

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शुक्रवारी प्रयागराजला पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लुकरगंजमधील माफिया अतिक अहमदच्या ताब्यातून मुक्त केलेल्या जमिनीवर बांधलेल्या ७६ फ्लॅटच्या चाव्या गरजूंना सुपूर्द केल्या. Chief Minister Yogi handed over the flats built on the land seized by mafia Atik to the needy

    मुख्यमंत्री योगी यांनी २० लाभार्थ्यांशी संवाद साधला. म्हणाले- आमचे सरकार गरिबांच्या पाठीशी उभे आहे, पण पूर्वी असे नव्हते. पूर्वीची सरकारे माफियांच्या पाठीशी उभी असायची. यापूर्वी शासनाकडून संरक्षण मिळाल्यानंतर जमिनींवर माफिया कब्जा करत असत. पण सध्याच्या सरकारमध्ये हे शक्य नाही.

    मुख्यमंत्री योगींनी प्रयागराजमध्ये ७६८ कोटी रुपयांच्या २२६ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही केली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी पीडीए अधिकाऱ्यांसमवेत फ्लॅटच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि कॅबिनेट मंत्री नंद गोपाल नंदी उपस्थित होते.

    Chief Minister Yogi handed over the flats built on the land seized by mafia Atik to the needy

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    द फोकस एक्सप्लेनर: कोण आहे काँग्रेस हायकमांड? खरगे आणि राहुल गांधी यांच्या विधानांमध्ये दडलंय उत्तर

    UNSC President : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष झाला पाकिस्तान, या दोन मुद्द्यांवर काम करणार

    द फोकस एक्सप्लेनर : ट्रम्प-नेतन्याहू यांच्याविरोधात फतवा; इराणचा इशारा केवळ धमकी की मोठ्या युद्धाची सुरुवात?