मुख्यमंत्री योगींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना दिले चोख प्रत्युत्तर
विशेष प्रतिनिधी
गोरखपूर : Chief Minister Yogi उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या “मृत्यु कुंभ” विधानावर त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “होळीदरम्यान झालेल्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवू न शकलेल्यांनी प्रयागराजच्या महाकुंभाला ‘मृत्यु कुंभ’ म्हटले होते.”Chief Minister Yogi
गोरखपूर जर्नलिस्ट प्रेस क्लबच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी समारंभाला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, “पहिल्यांदाच तामिळनाडूमधून लोक आले होते. केरळमधूनही लोक आले होते. उत्तर प्रदेशची लोकसंख्या २५ कोटी आहे आणि होळी शांततेत साजरी झाली. पण, पश्चिम बंगालमध्ये होळीच्या वेळी अनेक दंगली झाल्या. होळी दरम्यान झालेल्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवू न शकलेल्यांनी प्रयागराजचा महाकुंभ ‘मृत्यु कुंभ’ असल्याचे म्हटले होते.
ते म्हणाले, “पण, आम्ही म्हटलं होतं की ते ‘मृत्यू’ नाहीये, ते ‘मृत्युंजय’ आहे. हे ‘महाकुंभ’ आहे. या कुंभमेळ्याने हे सिद्ध केले आहे की महाकुंभाच्या ४५ दिवसांत, दररोज पश्चिम बंगालमधील ५० हजार ते एक लाख लोक या कार्यक्रमाचा भाग होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १८ फेब्रुवारी रोजी सांगितले होते की चेंगराचेंगरीच्या घटनांमुळे महाकुंभ “मृत्यु कुंभ” मध्ये रूपांतरित झाला आहे. महाकुंभातील मृतांची खरी आकडेवारी अधिकाऱ्यांनी दडपली असल्याचा दावा त्यांनी केला होता. पश्चिम बंगाल विधानसभेत भाषण करताना बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, “मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी त्यांनी शेकडो मृतदेह लपवले आहेत. भाजपच्या राजवटीत महाकुंभाचे मृत्युकुंभात रूपांतर झाले आहे.
Chief Minister Yogi gave a befitting reply to Chief Minister Mamata Banerjee
महत्वाच्या बातम्या
- मोदींच्या मुलाखतीचे टायमिंग, पाकिस्तान फुटायच्या घडामोडी आणि अजित डोवाल + तुलसी गबार्ड भेट, विलक्षण योगायोग!!
- ‘मी कधीही हिंदीला विरोध केला नाही’ ; पवन कल्याण यांनी भाषा वादावर केली भूमिका स्पष्ट
- Pakistani security : रेल्वे अपहरणानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये स्फोट
- ISRO इस्रोची आणखी एक कामगिरी, SCL च्या सहकार्याने 32 बिट मायक्रोप्रोसेसर विकसित केला