लखनऊमधील गोमती नगरच्या विभूतीखंड परिसरातून अटक केली आहे.
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम वेगाने पूर्ण होत आहे. 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाच्या मंदिराच्या गर्भगृहात अभिषेक करण्यात येणार आहे. दरम्यान, नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अयोध्येच्या राम मंदिराला बॉम्बस्फोटाद्वारे उडवण्याची धमकी देण्यात आल्याची बातमी आली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यूपी एसटीएफच्या पथकाने याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.Chief Minister Yogi and Ayodhya bomb threat case STF arrests both
दोन आरोपींना बुधवारी संध्याकाळी यूपी एसटीएफने राजधानी लखनऊमधील गोमती नगरच्या विभूतीखंड परिसरातून अटक केली आहे. तहर सिंग आणि ओमप्रकाश मिश्रा अशी आरोपींची नावे असून दोघेही राज्यातील गोंडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अटक केलेल्या आरोपींनी चौकशीत सांगितले की ते एका पॅरामेडिकल संस्थेत काम करतात. आता दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राम मंदिर आणि एसटीएफचे एडीजी अमिताभ यश यांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर खळबळ उडाली होती. ईमेल पाठवणाऱ्याने तो दहशतवादी संघटना आयएसआयशी संबंधित असल्याचा दावा केला होता.
22 जानेवारीला अयोध्येत तयार होत असलेल्या भगवान श्रीरामाच्या मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे, त्यासाठी आधीच कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
Chief Minister Yogi and Ayodhya bomb threat case STF arrests both
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- भगवान श्रीराम शिकार करून मांस खात असत
- 1990 ची 2024 मध्ये रिपीट प्रयोगशाळा; सनातनला शिव्या घाला; स्वतःच्याच मतांना “खोडा” लावा!!
- महुआ मोईत्रा पुन्हा नव्या वादात अडकल्या, माजी प्रियकराची हेरगिरी केल्याचा आरोप
- कर्नाटकी कशिदा त्यांनी काढिला; काँग्रेसची बोट लागली बुडायला!!