• Download App
    'जिथे बांधण्याचा संकल्प केला होता तिथेच मंदिर उभारले' ; योगींचं विधान!|Chief Minister Yogi Adityanaths speech after the celebration of Ram temple in Ayodhya

    ‘जिथे बांधण्याचा संकल्प केला होता तिथेच मंदिर उभारले’ ; योगींचं विधान!

    जणू काही आपण त्रेतायुगात प्रवेश केला आहे, अशी भावनाही योगींनी यावेळी व्यक्त केली.


    विशेष प्रतिनिधी

    अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लाच्या अभिषेकनंतर भाषणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, जिथे मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता तिथेच मंदिर बांधले गेले आहे. 500 वर्षांनंतर रामलल्ला आपल्या मंदिरात विराजमान झाले आहेत. जणू काही आपण त्रेतायुगात प्रवेश केला आहे. बहुसंख्य समाजाने यासाठी संघर्ष आणि लढा दिल्याचे ते म्हणाले.Chief Minister Yogi Adityanaths speech after the celebration of Ram temple in Ayodhya

    ते म्हणाले की, आज प्रत्येक घरात रामाचे नाव घेतले जात आहे. रामाचे जीवन आपल्याला संयम शिकवते आणि भारतीय समाजानेही संयम दाखवला. अयोध्या धामचाही विकास केला जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अयोध्येत विमानतळ व्हावे हे एकेकाळी स्वप्न होते ते आज पूर्ण होत आहे.



    मुख्यमंत्री योगी म्हणाले की, प्रभू रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत तुम्हा सर्वांचे खूपखूप अभिनंदन. मन भावनिक आहे. आज या ऐतिहासिक प्रसंगी भारतातील प्रत्येक शहर, प्रत्येक गाव अयोध्याधाम आहे. रामाचे नाव प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येक डोळा आनंदाच्या आणि समाधानाच्या अश्रूंनी ओलावला आहे. प्रत्येक जीभ रामनामाचा जप करीत आहे. राम प्रत्येक कणात असतो. आपण त्रेतायुगात आलो आहोत असे वाटते.

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, श्री रामजन्मभूमी ही कदाचित जगातील अशी पहिलीच अनोखी घटना असेल ज्यामध्ये एखाद्या राष्ट्रातील बहुसंख्य समुदायाने जन्मभूमीवर मंदिर उभारणीसाठी इतकी वर्षे आणि इतक्या पातळ्यांवर लढा दिला. जिथं बांधायचा संकल्प केला होता तिथंच मंदिर बांधलं गेलं याचा आनंद आहे.

    Chief Minister Yogi Adityanaths speech after the celebration of Ram temple in Ayodhya

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले