• Download App
    ‘’भारतात कोट्यवधी लोकांना मोफत रेशनचा लाभ, तर पाकिस्तानमध्ये प्रत्येक दाण्यासाठी लोकांचा संघर्ष सुरू’’ मुख्यमंत्री योगींनी सांगितले वास्तव!Chief Minister Yogi Adityanath reaction on free ration commented on the dire situation in Pakistan

    ‘’भारतात कोट्यवधी लोकांना मोफत रेशनचा लाभ, तर पाकिस्तानमध्ये प्रत्येक दाण्यासाठी संघर्ष ’’ मुख्यमंत्री योगींनी सांगितले वास्तव!

    गृहमंत्री अमित शाह यांचीही याप्रसंगी होती उपस्थिती; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    Yogi Adityanath on Free Ration : केंद्रीय गृहमंत्र्यांनी कौशांबी महोत्सवाचे उद्घाटन केले आणि अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्यासोबत उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी सर्वसामान्यांना संबोधित केले. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या विधानाची अधिक चर्चा होत आहे की, ‘’भारतात मोदी सरकार लोकांना फुकट खाऊ घालण्याची योजना चालवत आहे, तर शेजारील देश पाकिस्तानमधील लोक खाण्यापिण्यासाठी तरसत आहेत.’’ असं ते म्हणाले. Chief Minister Yogi Adityanath reaction on free ration commented on the dire situation in Pakistan

    योगी आदित्यनाथ जनतेला संबोधित करत असताना त्यांनी मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत मंचावर एक मोठी गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितले की, ‘’मीडियामध्ये सतत असे दाखवले जात आहे की पाकिस्तानमधील लोकांना पीठ आणि गव्हाचा तुटवडा जाणवत आहे. लोकांना पीठ घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. कारण पिठाचा पुरवठा होत नाही. देशात गव्हाचा तुटवडा आहे. भारतासोबतचा व्यापारही बंद आहे. परकीय चलनाची तीव्र टंचाई आहे. सरकारला वेळेवर बाहेरून गहू खरेदी करता आला नाही. आता रांगेत उभे असलेले लोक चेंगराचेंगरी करत आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्यातच पीठासाठी रांगेत उभे असताना चेंगराचेंगरी होऊन १०० हून अधिक महिला आणि वृद्धांचा मृत्यू झाला आहे.’’

    याशिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हेही सांगितले की, ‘’आपले राज्य लोकसंख्येच्या बाबतीत देशातील सर्वात मोठे राज्य आहे. मात्र केवळ आपले राज्यच नाही तर देशातील ८० कोटी लोकसंख्येला मोफत रेशनचा लाभ मिळत आहे. कोरोना महामारीपासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत केंद्र सरकार गरीब कुटुंबांना मोफत रेशन देत आहे. सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन योजनेचा लाभ मिळत आहे. यासोबतच केंद्र सरकार डाळी, तेल, मसाले यांचेही वाटप करत आहे, जेणेकरून लहान मुले आणि महिलांना पोषक तत्वांची कमतरता भासू नये.’’

    Chief Minister Yogi Adityanath reaction on free ration commented on the dire situation in Pakistan

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!