• Download App
    उत्तर प्रदेशात मजुरांच्या खात्यात १ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा ; २३ लाख जणांना फायदा Chief Minister Yogi Adityanath, daily wage workers, financial assistance, COVID-19 in Uttar Pradesh,

    उत्तर प्रदेशात मजुरांच्या खात्यात १ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा ; २३ लाख जणांना फायदा

    वृत्तसंस्था

    लखनौ : उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने २३ लाख मजुरांच्या खात्यात प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत जमा केली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही मदत देण्यात आली आहे. Chief Minister Yogi Adityanath, daily wage workers, financial assistance, COVID-19 in Uttar Pradesh,

    उत्तर प्रदेशात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना कोरोना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने पाऊल उचलले होते. त्या अंतर्गत मजुरांच्या बँक खात्यात कर्मगार कल्याण बोर्डाने 230 कोटी रुपये हस्तांरीत केले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी (ता.१०) या योजनेचा प्रारंभ केला. ऑनलाइन कार्यक्रमात आदित्यनाथ यांच्या हस्ते ५ मजुरांना १ हजार रुपये देण्यात आले.



    राज्याचे अर्थमंत्री सुशील खन्ना यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने मजुरांना अर्थसहाय्य देण्याची योजना तयार केली होती. त्याशिवाय मजुरांना सरकारतर्फे २० किलो गहू, १५ किलो तांदूळ यांचे वाटप केले. ,१ कोटी ६५ लाख ३१ हजार मजूर, हॉकर्स, व्हेंडर आणि इतरांना त्याचा फायदा झाला आहे.

    यापूर्वी सरकारने मजूर आणि रोजंदारीवरील कामगारांसाठी दोन विमा योजना सुरु केल्या होत्या. दोन लाख रुपयांचे अपघाती मृत्यू आणि अपंगत्व यासाठी विमा कव्हर त्यांना देण्यात आले होते. शिवाय 5 लाखांचा आरोग्य विमा देखील उतरविला होता.

    Chief Minister Yogi Adityanath, daily wage workers, financial assistance, COVID-19 in Uttar Pradesh,

     

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट