• Download App
    'तुरुंगात गेल्यापासून मती भ्रष्ट झाली', मुख्यमंत्री योगींचा अरविंद केजरीवालांवर टोला!|Chief Minister Yogi Adityanath criticizes Arvind Kejriwal

    ‘तुरुंगात गेल्यापासून मती भ्रष्ट झाली’, मुख्यमंत्री योगींचा अरविंद केजरीवालांवर टोला!

    जाणून घ्या, अण्णा हजारेंवरून केजरीवालांना काय सुनावले आहे?


    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रहार केला आहे. तुरुंगात गेल्यानंतर केजरीवाल यांचे बुद्धी फिरली आहे. अण्णा हजारेंची स्वप्ने उद्ध्वस्त करणारे केजरीवाल आता माझ्या नावाने बोलत आहेत.Chief Minister Yogi Adityanath criticizes Arvind Kejriwal

    ज्या काँग्रेसच्या विरोधात अण्णांनी आंदोलन केले होते, त्याच काँग्रेसला केजरीवाल यांनी गळ्यातील ताईत बनवल्याचे योगी म्हणाले. मुख्यमंत्री योगी गुरुवारी तिंदवारी येथे हमीरपूर-महोबा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रॅलीला संबोधित करत होते. येथून पक्षाचे उमेदवार पुष्पेंद्रसिंह चंदेल यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.



    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, तुरुंगात गेल्यानंतर त्यांना समजले की आता ते कधीच तुरुंगातून बाहेर येणार नाहीत. त्यांनी अण्णा हजारे यांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. या पापासाठी अण्णा हजारे त्यांना कधीच माफ करणार नाही.

    सत्तेत आल्यानंतर आम आदमी पक्षाने भ्रष्ट लोकांना स्वतःभोवती गोळा केले आहे. माझ्या आंदोलनातून निर्माण झालेले नेते कोणते राजकारण करत आहे पाहून अण्णांना वाईट वाटत असेल. केजरीवाल तुरुंगात गेल्याने दिल्लीतील लोकांना आनंद झाला की निदान त्यांचा खोकला तरी थांबला आहे, आता ते पुन्हा दिल्लीच्या जनतेला खोकण्यास भाग पाडतील.

    Chief Minister Yogi Adityanath criticizes Arvind Kejriwal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट