Sunday, 11 May 2025
  • Download App
    Eknath Shinde एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून ‎शेतकऱ्यांना

    Eknath Shinde : एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून ‎शेतकऱ्यांना भरपाई देणार, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

    Eknath Shinde

    Eknath Shinde

    विशेष प्रतिनिधी

    लातूर : जिल्ह्यात २ सप्टेंबर रोजी ३२ महसूल‎मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या‎अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची‎पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री‎एकनाथ शिंदे, ( Eknath Shinde)   उपमुख्यमंत्री देवेंद्र‎फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या‎बांधावर पोहचले. यावेळी त्यांनी‎उदगीर तालुक्यातील हेर आणि‎लोहारा शिवारातील पिक नुकसानीची‎पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांकडून‎नुकसानीची माहिती घेतली.‎

    शेतकऱ्यांना एनडीआरएफचे‎निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त‎नुकसान भरपाई दिली जाईल, असे‎मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी‎सांगितले. तसेच अतिवृष्टीने‎झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने‎करून शेतकऱ्यांना लवकरात‎नुसकान भरपाई देण्यात येईल, असे‎उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.‎



    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या‎उपस्थितीत आयोजित मुख्यमंत्री‎महिला सशक्तीकरण अभियानाला‎उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे‎व उपमुख्यमंत्री फडणवीस हे लातूर‎जिल्हा दौऱ्यावर आले होते. हा‎समारंभ झाल्यानंतर नुकसानीची‎पाहणी करण्यासाठी दोघेही थेट‎शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले.‎

    विमा कंपनीकडून 25% अग्रिम- मुंडे‎

    अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तीन प्रकारे मदत‎मिळणार आहे. त्यात जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना‎‎वेगळ्या निकषाने, गुरांच्या नुकसानीसाठी‎‎वेगळी मदत व पीक नुकसानीसाठी‎‎एसडीआरएफ, एनडीआरएफच्या‎‎निकषानुसार मदत दिली जाईल, अशी‎‎माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.‎‎विमा कंपनीकडून २५ टक्के अग्रिम‎शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. ४ सप्टेंबर‎रोजी पाथरी तालुक्यातील रेणापूर येथे पाहणी केली.‎

    Chief Minister Shinde announced that farmers will be compensated by keeping NDRF criteria aside

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज