• Download App
    पंतप्रंधान मोदींची सहकुटुंब भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले... Chief Minister Eknath Shinde expressed his feelings after meeting Pant Prandhan Modis family 

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची घेतली भेट

    जाणून घ्या, पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कोणत्या मुद्य्यावर केली चर्चा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात विविध विषयार चर्चा केली. या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्वीटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. Chief Minister Eknath Shinde expressed his feelings after meeting Pant Prandhan Modis family

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, ‘’देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला.’’

    याशिवाय ‘’महाराष्ट्रातील जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली. इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याबाबत सहवेदना व्यक्त करत या संकटात केंद्र सरकार पाठीशी असल्याचे ते म्हणाले. तसेच बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबत माहिती घेतली. धारावी पुनर्विकास हा सर्वात मोठा प्रकल्प असून त्यामुळे मुंबईचा चेहरा बदलणार आहे. त्याचबरोबर गरीब नागरिकांना सुखाचे आयुष्य जगता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प विनाअडथळा वेगाने पूर्ण करावा, रखडलेले पुर्नविकास प्रकल्प मार्गी लावावेत, असे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळे राज्यातील असे प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय वारंवार होणारी अतिवृष्टी, त्यामुळे येणारी संकटे यावर आस्थेवाईकपणे चर्चा केली.’’ असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

    याचबरोबर, ‘’कोकणात उदंड पाऊस पडून पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळवता येईल, मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनांबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली. याशिवाय राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, आवश्यक बदल या मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली. गेले वर्षभर केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ राज्य सरकारला मिळत आहे. ते सहकार्य यापुढेही कायम मिळो, ही मागणी मान्य करत पंतप्रधानांनी आश्वस्तही केले. पंतप्रधानांची आपुलकी, आशीर्वादाचा हात आणि आस्था नवे बळ देणारी आहे.’’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

    Chief Minister Eknath Shinde expressed his feelings after meeting Pant Prandhan Modis family

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!