सर्व मदरशांची पडताळणी करण्यात यावी आणि कुठेही अनैतिक कृत्य समोर आल्यास तत्काळ… असेही म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
देहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोमवारी नैनिताल जिल्ह्यातील वीरभट्टी येथील एका बेकायदेशीर मदरशात मुलांशी होत असलेल्या कथित अमानवी वागणुकीची दखल घेत अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांना राज्यातील सर्व मदरशांची पडताळणी करण्याचे निर्देश दिले. Chief Minister Dhamis instructions to inspect all Madrasahs in Uttarakhand
अपर मुख्य सचिवांना दिलेल्या सूचनांमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या सर्व मदरशांची पडताळणी करण्यात यावी आणि कुठेही अनैतिक कृत्य समोर आल्यास तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
या संदर्भात गृह विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. रविवारी एका पालकाच्या तक्रारीवरून पोलिसांच्या पथकाने नैनितालमधील जिओलीकोटजवळील वीरभट्टी येथे सुरू असलेल्या या मदरशाला भेट दिली. या मदरशात कथित शारिरीक अत्याचारासह मुलांवर अमानुष वागणूक झाल्याची प्रकरणे नोंदवली गेली. मुलांची प्रकृती ठीक नसून त्यांना शुद्ध अन्न व पाणी दिले जात नसल्याचेही समोर आले आहे. नोंदणीशिवाय मदरसा सुरू असल्याचेही उघड झाले.
Chief Minister Dhamis instructions to inspect all Madrasahs in Uttarakhand
महत्वाच्या बातम्या
- न्यूजक्लिकप्रकरणी प्रबीर-अमित यांच्या याचिकेवर HCचा निर्णय राखीव; UAPA अंतर्गत झाली अटक
- WATCH : चीननेच घडवली अतिरेकी निज्जरची हत्या, अमेरिकेतील मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या दाव्याने खळबळ
- छत्तीसगडसाठी भाजपने जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी; तीन खासदारांना तिकीट
- परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, सप्तश्रृंगी गडासाठी शिंदे – फडणवीस सरकारचा 531 कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा!!