वृत्तसंस्था
जयपूर : मणिपूर मध्ये दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्याचा मुद्दा देशभर तापला असताना काँग्रेसने केंद्रातल्या मोदी सरकारला चहूबाजूंनी घेरले, पण राजस्थान – छत्तीसगड मधल्या अत्याचारांवर तिथली काँग्रेस सरकारे मूग गिळून गप्प बसली आहेत. या पार्श्वभूमीवर राजस्थानातल्या महिला अत्याचाराविरुद्ध तिथल्याच एका मंत्राने आवाज उठविला, पण या मंत्र्यांनी आवाज उठवणे राजस्थानच्या काँग्रेस सरकारला सहन झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपल्याच मंत्र्याला मंत्रिमंडळातून डच्चू दिला. Chief Minister Ashok Gehlot’s Dachhu to Congress Minister
मणिपूर विषयी नक्रारश्रू ढाळण्यापेक्षा राजस्थान सरकारने आपल्या राज्यातल्या महिला अत्याचारांविषयी “अपने गिरेबान में झाक कर देखना चाहिए”, असा सल्ला राजस्थानचे राज्यमंत्री राजेंद्र सिंह गुढा यांनी आपल्या सरकारला दिला. विधानसभेत ते बोलले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांनी याच मुद्द्यावर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर शरसंधान साधले.
आपल्याच मंत्र्याने राजस्थानातल्या महिला अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केल्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना सहन झाले नाही. त्यांनी ताबडतोब राज्यमंत्री राजेंद्र सिंह गुढा यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पत्र लिहिले आणि राजेंद्र सिंह गुढा यांनी मंत्रिमंडळाचे अनुशासन पाळले नसल्याचा ठपका ठेवला. त्यांना मंत्रिपदावरून हटविण्याचा सल्ला दिला. राज्यपालांनी घटनेच्या चौकटीत राहून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राजेंद्र सिंह गुढा यांना मंत्रीपदावरून हटविले.
या सर्व प्रकारात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची मोठ्या प्रमाणावर किरकिरी झाली. राजस्थानात महिलांवर अत्याचार वाढल्याचे खुद्द त्यांच्या मंत्र्यांनीच विधानसभेत सांगितल्याने सरकारची नाचक्की झाली आणि आता तर मंत्र्यांनी केलेली टीकाही सहन न होऊन त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची हिमाकत अशोक गेहलोत यांनी केल्याने ते संपूर्ण राजस्थान टीकेचे धनी बनले आहेत.
Chief Minister Ashok Gehlot’s Dachhu to Congress Minister
महत्वाच्या बातम्या
- श्रीलंकेतही UPI द्वारे पेमेंट शक्य होणार; दोन्ही देशांनी स्वीकारले ‘व्हिजन डॉक्युमेंट’
- Gyanvapi Case: वादग्रस्त भाग वगळता संपूर्ण ‘ज्ञानवापी’ परिसराचे होणार ‘ASI’सर्वेक्षण
- NCW : मणिपूर मधल्या महिला अत्याचाराची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल; राज्य सरकारला विचारला जाब!!
- ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या निर्मात्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती!