वृत्तसंस्था
पणजी : गोव्यात काँग्रेस पक्ष भाजप सरकारला पराभूत करू शकत नाही. भाजपशी राजकीय टक्कर घेण्याची काँग्रेसची क्षमताच नाही, असा हल्लाबोल तृणमूळ काँग्रेसच्या नेत्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केला आहे.Chidambaram comes to Goa, just walks away
त्याच वेळी त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीय गृह आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरही अत्यंत प्रखर हल्ला चढविला आहे. चिदंबरम हे गोव्याचे काँग्रेसचे इन्चार्ज आहेत. ते नुसते गोव्यात येतात. रस्त्यावर फिरुन निघून जातात. अशा प्रकारे काँग्रेस पक्षाला भाजप सरकार कुठे घालवता येईल का?
अशा खोचक शब्दांत महुआ मोईत्रा यांनी चिदंबरम यांच्या निमित्ताने काँग्रेसचे वाभाडे काढले आहेत. त्याच वेळी आपण गोव्यात येथे मुक्काम ठोकणार आहोत. भाड्याचे घर घेऊन राहणार आहोत. पक्षाची संघटना बांधणी करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी देण्यात आली आहे, असे महुआ मोईत्रा यांनी आवर्जून सांगितले.
भाजपला हरविण्याची इच्छाशक्ती काँग्रेसकडे उरलेली नाही. त्यामुळे त्यांची ती क्षमता देखील नाही. ही क्षमता फक्त तृणमूल काँग्रेस मध्ये आहे. पक्षाची संघटना वाढली की भाजपशी पंगा घेणे आमच्यासारख्या उत्साहाने सळसळणाऱ्या पक्षाला अवघड नाही, असा दावा देखील त्यांनी केला.
राजकीय कार्यशैलीचा फरक
काँग्रेस पक्ष आणि तृणमूळ काँग्रेस पक्ष यांच्यातल्या राजकीय कार्यशैलीचा फरकच त्यांनी एक प्रकारे अधोरेखित केला. काँग्रेस पक्षाचे हायकमांड अनेक काँग्रेस नेत्यांना राज्याचे इन्चार्ज बनवते. परंतु हे इन्चार्ज नेते त्या त्या राज्यांमध्ये जाऊन तळ ठोकून काम करताना दिसत नाहीत.
काँग्रेस पक्षामध्ये कोणता राजकीय पेचप्रसंग आला किंवा काँग्रेस पक्षाच्या संघटनेचे काही विशेष काम असेल, संघटनात्मक पातळीवर बदल करायचा असेल तर हे इन्चार्ज संबंधित राज्यांमध्ये येतात. ही आत्तापर्यंतची काँग्रेसची कार्यसंस्कृती राहिली आहे. नेमका त्याचाच खोचक उल्लेख महुआ मोईत्रा यांनी करून काँग्रेस पक्षाला डिवचले आहे.
तृणमूळ संघटना बांधणी
गोव्याच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत भावामुळे मित्रा महुआ मोईत्रा गोव्यात भाड्याने घर घेऊन राहणार आहेत. त्यामुळे गोव्यात देखील इथून पुढच्या काळात भाजप विरुद्ध काँग्रेस या दुहेरी लढतीत आता तृणमूळ काँग्रेसचा रूपाने त्रिकोणी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अर्थात तृणमूळ काँग्रेसची संघटना बांधणी करण्यात महुआ मोईत्रा यांना किती यश मिळते?, त्यावर ही त्रिकोणी लढत किती तसेच कशी रंजक बनते हे अवलंबून आहे.