• Download App
    छत्तीसगड: मद्य घोटाळ्याप्रकरणी EDने निवृत्त आयएएस अधिकाऱ्यास केली अटक| Chhattisgarh ED arrests retired IAS officer in liquor scam case

    छत्तीसगड: मद्य घोटाळ्याप्रकरणी EDने निवृत्त आयएएस अधिकाऱ्यास केली अटक

    EDने निवृत्त आयएएस अधिकारी अनिल टुटेजा आणि इतर आरोपींविरुद्ध नवीन ईसीआयआर नोंदवून त्यांना अटक केली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    रायपूर : केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने निवृत्त आयएएस अधिकारी अनिल टुटेजा यांना अटक केली आहे. छत्तीसगडमधील मद्य घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, 2000 कोटींहून अधिक रुपयांच्या या मद्य घोटाळ्यात ईडीने 8 एप्रिल रोजी आरोपपत्र दाखल केले होते, परंतु गुन्हा सिद्ध न झाल्याने न्यायालयाने हे प्रकरण रद्द केले होते.Chhattisgarh ED arrests retired IAS officer in liquor scam case



    यानंतर EDने निवृत्त आयएएस अधिकारी अनिल टुटेजा आणि इतर आरोपींविरुद्ध नवीन ईसीआयआर नोंदवून त्यांना अटक केली आहे. माजी आयएएस अनिल टुटेजा यांनी मद्य व्यापारी आणि राजकारण्यांच्या संगनमताने हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. फेडरल एजन्सीने 2003 च्या बॅचच्या अधिकाऱ्याला शनिवारी रायपूर येथील आर्थिक गुन्हे शाखा (EOW)लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो कार्यालयातून ताब्यात घेतले होते, जेथे ते आणि त्यांचा मुलगा यश टुटेजा या प्रकरणात त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी आले होते.

    आयएएस अधिकाऱ्याला नंतर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार ताब्यात घेण्यात आले आणि रिमांडसाठी त्याला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे, सूत्रांनी सांगितले. अनिल तुटेजा गेल्या वर्षी प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले.

    Chhattisgarh ED arrests retired IAS officer in liquor scam case

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!