बालोद जिल्ह्यात घडली दुर्घटना; एका लहान मुलीस गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विशेष प्रतिनिधी
बालोद : छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. यामध्ये दहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय एका लहान मुलीस जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की बोलेरो गाडीचा अक्षरशा चुराडा झाला. लग्न समारंभावरून घरी परतत असताना हा अपघात झाला. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. Chhattisgarh 10 killed and one child seriously injured after a truck and car collided
बालोद येथे बोलेरोला ट्रॅकने धडक दिली –
बालोद जिल्ह्यातील पुरूर आणि चरमा दरम्यान बालोदगहान जवळ हा अपघात झाला. लग्न समारंभ आटोपून परत येत असलेल्या बोलेरो व ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला असून एका मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री उशिरा झालेल्या या अपघाताचे चित्रही विदारक आहे. दुर्घटनास्थळी सर्वत्र लोकांचे मृतदेह पडले होते. बोलोरे जीपच्या काचा व तुकडे विखुरलेले होते.
बोलेरोमधील लोक धमतरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. जिल्ह्यातील सोराम भाटगाव येथून ११ जण कांकेर चरामा येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. मात्र रात्री दहा वाजेच्या सुमारास ते परतत असताना ही भीषण दुर्घटना आहे. या अपघातात चार पुरुष, पाच महिला आणि एका बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Chhattisgarh 10 killed and one child seriously injured after a truck and car collided
महत्वाच्या बातम्या
- जंतरमंतरवर कुस्तीगीरांची पोलिसांशी बाचाबाची, बेड नेण्यावरून वाद, पहिलवानांचा आरोप– मद्यधुंद पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ केली
- जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; AK47, पिस्तूलासह इतर दारूगोळा जप्त
- कर्नाटकात काँग्रेस उमेदवाराच्या भावाच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा, झाडावर आढळले एक कोटी रुपये
- अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सलग दहाव्यांदा वाढवले व्याजदर, 0.25 टक्के वाढ, 16 वर्षांतील सर्वोच्च