• Download App
    बिहारमध्ये छठच्या आनंदाचे रूपांतर शोकात; सनकी प्रियकराने कुटुंबातील सहा जणांवर झाडल्या गोळ्या! Chhath joy turns to mourning in Bihar Crazy boyfriend shot six people in the family

    बिहारमध्ये छठच्या आनंदाचे रूपांतर शोकात; सनकी प्रियकराने कुटुंबातील सहा जणांवर झाडल्या गोळ्या!

    गोळीबारामागील हेतू प्रेमप्रकरण होते, असे पोलिसांनी सांगितले.

    विशेष प्रतिनिधी

     लखीसराय : छठ उत्सवाच्या चौथ्या दिवशी बिहारमधील लखीसराय येथे एकाच कुटुंबातील सहा जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर चार जणांना पाटणा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Chhath joy turns to mourning in Bihar Crazy boyfriend shot six people in the family

    लखीसराय येथील पंजाबी मोहल्ल्यात विनयभंगाच्या वादातून एका सनकी तरुणाने ही घटना घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे. एएनआयने लखीसरायचे पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, स्थानिक अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासातून असे दिसून आले आहे की गोळीबारामागील हेतू प्रेमप्रकरण होते.

    पंकज कुमार यांनी एएनआयला सांगितले की, लखीसरायच्या कबैया पोलीस स्टेशन अंतर्गत पंजाबी परिसरात एकाच कुटुंबातील दोन सदस्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि इतर चार जण जखमी झाले. छठघाटावरून पूजा करून परतत असताना ही घटना घडली.

    तीन जखमींना बेगुसराय सदर रुग्णालयातून पाटणा येथे दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

    Chhath joy turns to mourning in Bihar Crazy boyfriend shot six people in the family

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!