• Download App
    Chhagan Bhujbal and Ajit pawar criticise

    भुजबळांचे बंड अजितदादांना झेपेना; की त्या बंडाच्या आडून खेळताहेत वेगळाच “डाव”??

    नाशिक : छगन भुजबळांचे बंड अजित पवारांना झेपेना की त्या बंडाच्या ते वेगळाच “डाव” खेळत आहेत??, असा संशय मुंबईच्या वर्तुळातून व्यक्त होत आहे. Chhagan Bhujbal and Ajit pawar criticise

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना अजित पवारांनी संधी नाकारली. त्यामुळे ते नाराज झाले. त्यांनी बंडाचा झेंडा उभारून आता आठ दिवस उलटून गेले. या दिवसांमध्ये अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या कुठलाही संवाद झाला नाही. किंबहुना तशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या नाहीत. भुजबळांनी महाराष्ट्रातल्या ओबीसी नेत्यांना भेटून आपली स्वतंत्र राजकीय मोर्चे बांधणी सुरू ठेवली, पण तरीदेखील अजित पवार, सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांनी छगन भुजबळांची थेट बोलून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला नाही.

    मात्र आज जेव्हा छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला “सागर” बंगल्यावर गेले, तेव्हा मात्र अजित पवारांनी भुजबळांची नाराजी हा पक्षांतर्गत विषय असल्याची मखलाशी केली. आम्ही आमच्या पद्धतीने तो प्रश्न सोडवू, असे अजितदादा म्हणाले. सुरुवातीला छगन भुजबळांच्या बंडाची दखलही न घेणारे अजित पवार भुजबळांनी फक्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर तातडीने पक्षांतर्गत नाराजीचा विषय असल्याचे सांगून मोकळे झाले. त्यामुळे आपल्या पक्षातली नाराजी भाजपच्या दारात जाऊन पोहोचली, तर आपल्याला त्याची राजकीय किंमत चुकवावी लागेल, याची भीती अजित पवारांना वाटल्याचे यातून दिसून आले. भाजप म्हणजे काँग्रेस नव्हे, जिथे अजितदादांची दादागिरी खपवून घेतली जाईल!! म्हणूनच अजितदादांनी तातडीने भुजबळांची नाराजी राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितले. पण तरीही भुजबळांनी ते ऐकले नाही.


    Chhagan Bhujbal अजितदादांनी भूमिका मांडल्यानंतरही भुजबळांनी पुन्हा काढले अजितदादांच्या राजकीय नियोजनाचे वाभाडे!!


    या पार्श्वभूमीवर मुंबईच्या राजकीय वर्तुळातून वेगळाच राजकीय संशय व्यक्त केला जात आहे, तो म्हणजे अजित पवारांनी भुजबळांची ब्याद परस्पर भाजपमध्ये गेली, तर जाऊ दे, हे ठरविल्याचा आहे. भुजबळ राष्ट्रवादीतून भाजपकडे गेले तर जाऊ देत, त्यांना भाजपने त्यांच्या पक्षाच्या कोट्यातून मंत्रीपद दिले, तर देऊ दे. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळातलाच नेता मंत्री होईल. फडणवीस मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचा पुन्हा विशिष्ट दबदबा निर्माण होईल, असा अजित पवारांनी मनात होरा तर बांधला नाही ना??, असा हा संशय आहे.

    पण हे सगळे छगन भुजबळांना भाजप कोणत्या पद्धतीने “पॉलिटिकल ट्रीटमेंट” यावर अवलंबून आहे आणि भाजप कुठलीही “पॉलिटिकल ट्रीटमेंट” इतर कुठल्याही नेत्याच्या मनातल्या होऱ्यावर अवलंबून ठेवत नाही, हे आजचे वर्तमान आहे. त्यामुळे अजितदादांच्या मनातल्या होऱ्यातून अगदी जरी भुजबळांना भाजपने स्वतःच्या कोट्यातून मंत्रिपद दिले, तरी अजित पवारांना त्याची राजकीय किंमत चुकवावी लागणार नाही याची कोणीही गॅरंटी देऊ शकणार नाही.

    महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचे अजून पालकमंत्री पदांचे वाटप व्हायचे आहे. शिवाय कोणाला मंत्री ठेवायचे आणि कुणाला नाही, हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे हायकमांड ठरवणार आहे. या महत्त्वाच्या बाबी नजरेआड करून चालणार नाहीत. फडणवीस मंत्रिमंडळात भुजबळांची एन्ट्री होणे किंवा न होणे केवळ अजितदादांवर अवलंबून नाही, ही बाब आता फडणवीस – भुजबळ भेटीनंतर अधोरेखित झाली आहे.

    Chhagan Bhujbal and Ajit pawar criticise

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली