Thursday, 8 May 2025
  • Download App
    मनी लाँड्रिंग प्रकरणात राणा अय्युबविरुद्ध आरोपपत्र दाखल : EDने म्हटले- धर्मादायच्या नावावर लोकांची फसवणूक केली|Charge-sheet filed against Rana Ayyub in money laundering case ED says- cheated people in the name of charity

    मनी लाँड्रिंग प्रकरणात राणा अय्युबविरुद्ध आरोपपत्र दाखल : EDने म्हटले- धर्मादायच्या नावावर लोकांची फसवणूक केली

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात पत्रकार राणा अय्युब यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. राणा अय्युब यांच्यावर चॅरिटीच्या नावाखाली लोकांकडून बेकायदेशीरपणे निधी गोळा केल्याचा आरोप आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, राणा अय्युब यांनी मदत कार्यासाठी निधी उभारण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचा हेतू सामान्य जनतेची फसवणूक करण्याच्या उद्देशानेच होता, हे तपासात समोर आले आहे.Charge-sheet filed against Rana Ayyub in money laundering case ED says- cheated people in the name of charity

    2021 मध्ये यूपी पोलिसांनी अय्युब यांच्या विरोधात FIR नोंदवला होता, त्यानंतर ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरू केला. याप्रकरणी आता गाझियाबाद न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.



    राणा यांनी क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्मवर तीन कॅम्पेन सुरू केले होते

    ईडीने आरोप केला आहे की, राणा अय्युब यांनी ऑनलाइन क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म केट्टोवर तीन मोहिमा सुरू केल्या आणि त्यातून कोट्यवधी रुपये उकळले. या मोहिमांच्या माध्यमातून एप्रिल-मे 2020 दरम्यान झोपडपट्टीवासीय आणि शेतकऱ्यांसाठी जून-सप्टेंबर 2020 दरम्यान आसाम, बिहार आणि महाराष्ट्रात मदत कार्य आणि मे-जून 2021 मध्ये कोरोनाबाधित लोकांसाठी निधी उभारण्यात आला.

    धर्मादाय संस्थेचे पैसे वैयक्तिक खात्यात वळवल्याचा आरोप

    यादरम्यान राणा अय्युब यांना 2.69 कोटी रुपयांची देणगी मिळाली, त्यापैकी 80.49 लाख रुपये परकीय चलनात आले. यानंतर आयकर विभागाने राणा अय्युबविरुद्ध फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (FCRA) चे उल्लंघन केल्याप्रकरणी तपास सुरू केला, त्यानंतर अय्युब यांनी परदेशी देणगी परत केली.

    ईडीच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जमा झालेला निधी प्रथम अय्युब यांच्या वडील आणि बहिणीच्या खात्यात आला आणि येथून अय्युब यांच्या वैयक्तिक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला. यापैकी अय्युब यांनी स्वत:साठी 50 लाख रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट उघडले, तर 50 लाख रुपये दुसऱ्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. केवळ 29 लाख रुपये मदत कार्यासाठी वापरले गेले.

    राणा यांनी बनावट बिले सादर केली

    राणा अय्युब यांनी मदत कार्याच्या नावाखाली खर्च दाखवण्यासाठी बनावट बिले सादर केल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे. ईडीने आरोपपत्रात लिहिले आहे की, राणा अय्युब यांनी सामान्य लोकांकडून मिळालेल्या निधीची लाँडरिंग केली आणि नंतर हा निधी निष्कलंक दाखवण्याचा प्रयत्न केला. राणाला सरकारच्या परवानगीशिवाय किंवा नोंदणीशिवाय परदेशातून निधी प्राप्त झाला, जो 2010च्या परदेशी योगदान नियमन कायद्यानुसार अनिवार्य आहे.

    Charge-sheet filed against Rana Ayyub in money laundering case ED says- cheated people in the name of charity

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor- 7 मिनिटांत 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त; काय म्हणाल्या कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका? वाचा सविस्तर

    द फोकस एक्सप्लेनर : भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’- 1971 नंतरचा सर्वात मोठा प्रतिहल्ल! 5 मुद्दे

    भारताने 13 देशांना ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली, या ४ मुद्द्यांवर होता फोकस