• Download App
    Chardham Yatra चारधाम यात्रा 24 तासांसाठी स्थगित; जाणून घ्या, नेमकं काय कारण?

    Chardham Yatra : चारधाम यात्रा 24 तासांसाठी स्थगित; जाणून घ्या, नेमकं काय कारण?

    Chardham Yatra

    हरिद्वारमध्येच भाविकांना थांबविण्याचे निर्देश पोलिस आणि प्रशासनाला देण्यात आले आहेत.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – Chardham Yatra चारधाम यात्रा रद्द करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उत्तराखंडमध्ये यात्रा सुरू होती, जी आता रद्द करण्यात आली आहे. गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की चारधाम यात्रा पुढील २४ तासांसाठी स्थगित करण्यात आली आहे म्हणजेच रद्द करण्यात आली आहे. हरिद्वारमध्येच भाविकांना थांबविण्याचे निर्देश पोलिस आणि प्रशासनाला देण्यात आले आहेत.Chardham Yatra

    चारधाम यात्रा का स्थगित करण्यात आली आहे याची माहितीही आयुक्त पांडे यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की चारधाम यात्रा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे यात्रा २४ तासांसाठी स्थगित करण्यात आली आहे. प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास भाविकांना सांगण्यात आले आहे. हवामान सामान्य होईपर्यंत चारधाम मंदिरांना भेट देऊ नका.



    उत्तराखंडच्या डोंगराळ भागात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीमुळे हॉटेल बांधणारे नऊ कामगार बेपत्ता झाले आहेत. उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी प्रशांत आर्य म्हणाले की, सिलई बंदजवळ एक हॉटेल बांधण्यात येत आहे. त्या ठिकाणचे कामगार जवळच्याच एका छावणीत राहत होते. छावणीत सुमारे १९ कामगार होते. ढगफुटीमुळे नऊ कामगार बेपत्ता झाले आहेत.

    Chardham Yatra suspended for 24 hours; Know the exact reason

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार