• Download App
    चारधाम पुरोहितांच्या संघटनेची उत्तराखंडच्या विधानसभा निवडणूकीत उडी|Chardham Prist will contest election

    चारधाम पुरोहितांच्या संघटनेची उत्तराखंडच्या विधानसभा निवडणूकीत उडी

    विशेष प्रतिनिधी

    ऋषिकेश – चारधाम पुरोहितांच्या संघटनेने उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणूकीत उडी घेतली आहे. चारधाम तिर्थ-पुरोहीत हक हकुकधारी महापंचायत समितीचे अध्यक्ष कृष्णकांत कोटीयाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सर्वसाधारण सभेत हा निर्णय झाला.Chardham Prist will contest election

    १५ जागी आम्ही उमेदवार उभे करू, पण इतर अनेक जागी व्युहात्मक पातळीवर त्यांचा प्रभाव राहील.देवस्थान मंडळाविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी मोहिम उघडण्याची घोषणाही त्यांनी केली.



    याबाबत ते म्हणाले की, गेल्या अडीच हजार वर्षांपासून आमच्या हक्कांवर गदा आणून देवस्थान मंडळे स्थापन करण्याची परंपरा सुरु होती. भाजपने ती मोडीत काढली. याविषयीच आम्ही जनजागृती करू. आगामी अधिवेशनादरम्यान राज्य विधानसभा इमारतीला घेराव घालण्यात येईल.

    Chardham Prist will contest election

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये