• Download App
    दुहेरी चारधाम मार्गाला सर्वोच्च न्यायालयाची अखेर मंजुरी, महत्वाच्या प्रकल्प मार्गी लागणार|CharDham corridor will cleared by Court

    दुहेरी चारधाम मार्गाला सर्वोच्च न्यायालयाची अखेर मंजुरी, महत्वाच्या प्रकल्प मार्गी लागणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज दुहेरी चारधाम महामार्ग प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्या रुंदीकरणाला हिरवा कंदील दर्शविला. देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून भूतकाळामध्ये आपल्याला यामुळेच अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले होते, असे न्यायालयाने नमूद केले.CharDham corridor will cleared by Court

    लष्करासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचे महत्त्व नाकारता येत नाही तसेच त्याबाबत न्यायालय देखील अंदाज बांधू शकत नाही असे न्या. डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगतानाच यावर देखरेख ठेवण्यासाठी माजी न्या. ए.के.सिकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी एक सदस्यीय समिती स्थापन केली.



    ही समिती या प्रकल्पाच्या पाहणीचा अहवाल थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करू शकेल. चारधाम महामार्ग प्रकल्प हा ९०० किलोमीटरचा असून त्याच्यावर बारा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे सर्व ऋतूंमध्ये यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथपर्यंत जाता येईल.

    CharDham corridor will cleared by Court

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये

    माजी सरन्यायाधीश गवई म्हणाले-आरक्षण म्हणजे मागे राहिलेल्यांना समानता देणे, नवीन लोकांसाठी मार्ग बंद करणे नाही