• Download App
    मणिपूरमध्ये अराजकता; सुरक्षा दलांसमोरच कुकी-मैतेई समुदायात अंदाधुंद गोळीबार; शाळा जाळली|Chaos in Manipur; Indiscriminate firing in Kuki-Maitei community right in front of security forces; The school burned down

    मणिपूरमध्ये अराजकता; सुरक्षा दलांसमोरच कुकी-मैतेई समुदायात अंदाधुंद गोळीबार; शाळा जाळली

    वृत्तसंस्था

    इंफाळ : मणिपूर गेल्या अडीच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. शनिवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास बिष्णुपूर आणि चुराचांदपूर दरम्यानचा थोरबुंग परिसर गोळीबाराने हादरला होता. थोरबुंगच्या शाळेला काही लोकांनी आग लावली. येथून गोळीबार सुरू झाला. हे अनेकदा रात्री घडते, जेणेकरून समाजकंटक अंधारात पळून जाऊ शकतील. कुकी आणि मैतेई समुदायातील एक गटाने असे केले तर दुसऱ्या बाजूने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला जातो. परिणामी क्रॉस फायरिंगची परिस्थिती निर्माण होते.Chaos in Manipur; Indiscriminate firing in Kuki-Maitei community right in front of security forces; The school burned down



    जाळपोळ, गोळीबार, बॉम्बस्फोट… हे सर्व घडत होते, इतक्यात सीआरपीएफ बंकरसमोर ५०-६० जणांचा समूह अचानक मुख्य रस्त्यावर आला. रस्त्यावर खुलेआम गोळीबार होत होता. जमावाला भीती नव्हती. कुकी समाजातील लोक आपल्या गावावर हल्ला होण्याच्या भीतीने रस्त्यावर उतरले. जमाव बहुतेक पुरुषांचा होता. त्यांच्या खांद्यावर रायफल आणि हातात खांग (तलवारीसारखी शस्त्रे) होती. या क्रॉस फायरिंगमध्ये सुरक्षा दलांनी भास्कर रिपोर्टरला बंकरमध्ये लपवून वाचवले.

    सीआरपीएफ जवान सांगतात की दर तिसऱ्या-चौथ्या दिवशी ही परिस्थिती उद्भवते. कधी कुकी मैतेईवर हल्ला करतात, तर कधी मैतेई कुकी वस्तीला आग लावतात.

    Chaos in Manipur; Indiscriminate firing in Kuki-Maitei community right in front of security forces; The school burned down

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    India-Pakistan : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान चीनचा खरा चेहराही समोर

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!

    Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच’, युद्धबंदी दरम्यान भारतीय हवाई दलाचे मोठे विधान