वृत्तसंस्था
कोचीन : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अनेक महत्त्वपूर्ण बदल होत देशाची वाटचाल आत्मनिर्भर भारताकडे सुरू आहे. याच आत्मनिर्भरतेतून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत निर्मित सर्वोच्च विमानवाहू नौका “आयएएस विराट” हिचे कोचिंग शिपयार्ड मध्ये अनावरण केले.Changed Indian Navy insignia; The British Cross has gone and the Octagonal Mudra of Chhatrapati Shivaji Maharaj!!
त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौसेनेचे निशाण चिन्ह देखील बदलले या निशाण चिन्हावरील ब्रिटिश क्रॉस जाऊन त्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टकोनी राजमुद्रा आणि त्यात नौसेनेचे चिन्ह आले आहे. इतकेच नव्हे तर भारतीय सनातन धर्माने मानलेले सागराचे दैवता वरूण याला देखील अभिवादन करण्यात आले आहे. त्यामुळे या चिन्हावर “शं नो वरुणा:” हा त्रैअक्षरी मंत्र देखील कोरला आहे.
भारतीय नौसेनेचे निशाण चिन्ह ब्रिटिश काळात अर्थातच ब्रिटिश ध्वजासह म्हणजे युनियन जॅकसह असायचे. त्यावर सेंट जॉर्ज क्रॉस आणि नंतर नौसेना चिन्ह असायचे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील हा क्रॉस चिन्हावर अंकित होताच. फक्त त्यात भारतीय प्रजासत्ताकाचा प्रतिनिधी म्हणून चार सिंहांचा एम्ल्बम होता. 2001 ते 2004 दरम्यान वाजपेयी सरकारने यात बदल करून सेंट जॉर्ज क्रॉस काढून टाकला होता. परंतु 2004 मध्ये सरकार बदलले. सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षांच्या काळात पुन्हा यूपीए सरकार सत्तेवर आले. या सरकारच्या 2004 ते 2014 या 10 वर्षांच्या काळात पुन्हा नौसेनेच्या निशाण चिन्हावर सेंट जॉर्ज क्रॉस आला.
परंतु, आता 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौसेनेचे निशाण चिन्ह बदलून त्यावरील “सेंट जॉर्ज क्रॉस” काढून टाकून त्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टकोनी राजमुद्रा, सागराचा विशाल निळा रंग, नौसेनेचे प्रतीक नांगर आणि वरणदेवतेला नमन म्हणून “शं नो वरुणा:” हा मंत्र अंकित केला आहे. गौरवशाली भारतीय नौसेनेचे हे नवीन गौरवशाली निशाण चिन्ह आहे!!
Changed Indian Navy insignia; The British Cross has gone and the Octagonal Mudra of Chhatrapati Shivaji Maharaj!!
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव : 4 दिवसांच्या चर्चेनंतर समर्थनार्थ पडली 58 मते, भाजपचे वॉकआउट
- GST Collection : गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये कर संकलनात 28% वाढ; महाराष्ट्र टॉपवर, 1.44 लाख कोटींचे कलेक्शन
- बुलेट ट्रेन आता महाराष्ट्रात सुसाट; बीकेसीतील 10000 कोटींची जमीन देणार!!
- पश्चिम रेल्वेत परीक्षेविना नोकरीची संधी!!; करा ऑनलाईन अर्ज!!