वृत्तसंस्था
तिरुमला : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू शपथ घेतल्यानंतर आता ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. तिरुमला येथील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात पोहोचलेल्या नायडूंनी मंदिरातून भ्रष्टाचार नष्ट करून हिंदू धर्माच्या रक्षणाची शपथ घेतली.Chandrababu Naidu took an oath to protect Hinduism in Tirumala, said – will not tolerate corruption in the temple
चौथ्यांदा शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्या धार्मिक भेटीत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आपल्या कुटुंबासह तिरुमला येथे पोहोचले आणि पूजा केली. नायडू पत्नी, मुलगा नारा लोकेश, सून आणि काही नातेवाईकांसह तिरुपतीतील तिरुमला येथे पोहोचले होते. त्यांच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पवित्र मंदिरात प्रार्थना केली. यावेळी त्यांनी तिरुपती-तिरुमला प्रशासनाच्या शुद्धीकरणाची शपथही घेतली.
- चंद्राबाबू नायडूंनी आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ ; पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
जगन सरकारवर गंभीर आरोप
त्यांच्या आधीच्या जगन मोहन रेड्डी सरकारने व्यंकटेश्वर मंदिराची देखभाल करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) मध्ये अनियमितता केल्याचा आरोप सीएम नायडू यांनी केला.
तिरुमला येथून शुद्धीकरण सुरू
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मी तिरुमलापासून शासनाच्या शुद्धीकरणाची सुरुवात करेन. तिरूमलाची विटंबना मान्य नाही. तिरुमलामध्ये फक्त गोविंदाच्या नावाचा जप केला जाईल.
तिकिटांची काळ्या बाजारात विक्री करू नका
मागील राज्य सरकारने तिरुमला तिरुपती देवस्थानमचे व्यापारीकरण केल्याचा आरोप त्यांनी पुढे केला. प्रसाद दर्जेदार असावा, दर वाढू नयेत, दर्शनाची तिकिटे काळ्या बाजारात विकू नयेत, याला त्यांचे प्राधान्य आहे.
जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळावर निशाणा साधत चंद्राबाबू म्हणाले, ‘जगन सरकारने या धार्मिक स्थळाला गांजा, दारू आणि मांसाहाराचे केंद्र बनवले आहे. आता तिरुमला तिरुपती देवस्थानमचे शुद्धीकरण सुरू होणार आहे.
आंध्रला देशातील क्रमांक एकचे राज्य करणार
नायडू यांनी दारिद्र्यमुक्त समाजासाठी अथक परिश्रम करण्याचे आणि आंध्र प्रदेशला भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्याचे वचन दिले. गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आणि कारभारात जबाबदारी आणि पारदर्शकतेचे आश्वासन दिले.
राजकीय षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही
सीएम नायडू पुढे म्हणाले, ‘2047 पर्यंत तेलुगू लोक जगात पहिल्या क्रमांकावर असतील. मी आंध्र प्रदेशला देशातील नंबर वन राज्य बनवणार आहे. गुन्हा खपवून घेतला जाणार नाही. काही लोक गुन्हे करून आमच्यावर खोटे आरोप करत आहेत. राजकीय षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही.
Chandrababu Naidu took an oath to protect Hinduism in Tirumala, said – will not tolerate corruption in the temple
महत्वाच्या बातम्या
- बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चिनी नागरिकावर EDची कारवाई, १३ कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त!
- NEET वादात कोचिंग सेंटर्सनी ओतले तेल! कमी अभ्यासक्रम आणि सोप्या परीक्षेमुळे त्यांच्या नफ्यावर होतो थेट परिणाम
- PM मोदी इटली दौऱ्यावर रवाना, G7 शिखर परिषदेत सहभागी होणार!
- लोकसभा निवडणूक संपताच भाजपा विधानसभेसाठी झाली सक्रिय!