• Download App
    Chandrababu Naidu जगदीप धनखड यांच्या नादी लागून मोदी सरकार पडायला चंद्रबाबू नायडू 10 वर्षांचा अनुभव विसरलेत का??

    जगदीप धनखड यांच्या नादी लागून मोदी सरकार पडायला चंद्रबाबू नायडू 10 वर्षांचा अनुभव विसरलेत का??

    भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा देऊन 6 दिवस उलटून गेल्यानंतर देखील त्यांच्या राजीनाम्याचे राजकीय लळिताचे कीर्तन संपलेले नाही. त्यांच्या राजीनाम्याचे अधिकृत कारण बाहेर आले असले, तरी खरे कारण अजून बाहेर आले नाही. त्यासंदर्भातला खुलासा मोदी सरकारने केला नाही. त्याचबरोबर तो जगदीप धनखड यांनी देखील समोर येऊन केलेला नाही. त्यामुळे जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याविषयी देशभरातल्या राजकीय वर्तुळामध्ये फक्त राजकीय पतंगबाजी सुरू आहे. त्यापलीकडे काही नाही.

    जगदीप धनखड यांच्या राजीनामे विषयी अनेकांनी अनेक तर्कवितर्क लढविले अनुमानी लावली ती आपापल्या अनुभवानुसार आणि बुद्धीच्या वकुबानुसार लावली. त्यातून अनेक political theories तयार झाल्या. त्यापैकी एकाही theory वर जगदीप धनकड किंवा मोदी सरकार यांनी शिक्कामोर्तब केले नाही. त्यामुळे त्या political theories फक्त वर्तमानपत्रांच्या कागदावर, टीव्ही चॅनलच्या पडद्यावर युट्युब चॅनेलच्या मोबाईल स्क्रीनवर राहिल्या.

    यापैकीच एक थिअरी म्हणजे जगदीप धनखड म्हणे, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सहकार्याने मोदी सरकार पाडायला निघाले होते. जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतींच्या सरकारी निवासस्थानात बसून वेगवेगळे राजकारण खेळले. त्यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश कपिल सिब्बल यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांना सामील करून घेतले. त्याचवेळी त्यांनी म्हणे, अरविंद केजरीवाल यांना उचकवले‌ त्यांना काँग्रेसच्या जवळ आणायचा प्रयत्न केला त्याचबरोबर चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पक्षाच्या पाच खासदारांना घरी बोलवून त्यांना मोदी सरकार पाडायची युक्ती सांगितली. ती युक्ती चंद्राबाबूच्या गळीत तुम्ही उतरवा, अशी गळ घातली. हे सगळे राजकारण जगदीप धनकड उपराष्ट्रपतींच्या अधिकृत सरकारी निवासस्थानात बसून खेळले. ही थिअरी राजकीय वर्तुळातून समोर आली. तिच्यावर अनेकांचा विश्वास बसला, कारण तिचा परिणाम धनखड यांच्या राजीनाम्यात झाला.



    – चंद्राबाबू दुधखुळे आहेत का??

    पण या theory मधूनच एक अत्यंत महत्त्वाचा सवाल समोर आला, तो म्हणजे जगदीप धनखड यांच्यासारख्या मूळच्या समाजवादी प्रवृत्तीच्या नेत्याच्या नादी लागून केंद्रातले मजबूत असलेले मोदी सरकार पाडायला चंद्राबाबू नायडू हे दुधखुळे राजकारणी आहेत का??, ते गेल्या 10 वर्षांमधला राजकीय अनुभव पूर्ण विसरून गेलेत का??, हे ते सवाल होत.

    जरा मागे जाऊन आठवून पाहिले, तर ज्या दिवशी किंवा ज्या वर्षी चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदींची साथ सोडली होती, त्या दिवसापासून चंद्राबाबूंच्या राजकारणाला उतरती कळा लागली होती. मोदी सरकार आपल्या पाठिंब्यावर अवलंबून राहील. मोदींना स्वतंत्रपणे बहुमत मिळणार नाही. त्यामुळे आपणच केंद्रातले सरकार चालवू, अशी चंद्राबाबूंच्या मनात महत्त्वाकांक्षा फुलली होती. त्यामुळे त्यांनी भाजप बरोबरचे संबंध तोडले होते.

    – 10 वर्षांचा सत्तेचा उपवास

    पण त्यानंतर गेल्या 10 वर्षांमध्ये भाजप नावाचा पक्ष वाढला आणि तेलगू देशांना नावाचा पक्ष डब्यात गेला होता. चंद्रबाबूंनी मोदींची साथ सोडण्याचा परिणाम मोदींना भोगाव लागण्याच्या ऐवजी खुद्द चंद्राबाबूंना भोगाव लागला होता. ते आंध्र प्रदेशात 10 वर्षे सत्तेबाहेर राहिले होते. जगन मोहन रेड्डी सरकारने चंद्राबाबूंच्या घराला खणत्या लावल्या होत्या. त्यामुळे त्या 10 वर्षांच्या राजकारणातून धडा घेऊनच चंद्राबाबूंनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींशी पुन्हा जुळवून घेतले. त्याचा सुपरिणाम आंध्र प्रदेशाबरोबरच केंद्रातही दिसला. मोदी आणि चंद्राबाबू या दोघांनाही फायदा झाला आणि ते सत्तेवर आले. चंद्राबाबूंचा सत्तेचा 10 वर्षांचा उपवास मोदींच्या राजकीय सहवासात सुटला.

    – चंद्राबाबूंचा नेमका लाभ कुठला??

    आता असे चंद्राबाबू नायडू अवघ्या वर्षभरामध्ये समाजवादी प्रवृत्तीच्या जगदीप धनखड यांच्या नादी लागून मोदी सरकार पाडतील आणि स्वतंत्र वाटचालीसाठी मोकळे होतील, असे कुणी शपथेवर सांगितले तरी कुणाला खरे वाटेल का?? शिवाय आत्ता मोदी सरकार पाडून चंद्राबाबूंना असा कोणता राजकीय लाभ होणार होता??, ज्यामुळे चंद्राबाबू हे धनखड यांच्या नादी लागले असते??, या साध्या सवालांची उत्तरे नकारात्मक आहेत. कारण चंद्राबाबू एवढ्या लवकर 10 वर्षांचा अनुभव विसरण्याएवढे भोळे राजकारणी नाहीत.

    Chandrababu Naidu is not politically stupid to get caught up into the net of Jagdeep dhankhad

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अमेरिकेने 25 % टेरिफ लादले तरी भारत स्वतःचेच राष्ट्रहित साधेल; परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्पना ठाणकावले!!

    Jaishankar : कान उघडे ठेवून ऐका, मोदी – ट्रम्प यांच्या दरम्यान एकही फोन कॉल नाही, एस. जयशंकर यांनी विरोधकांना सुनावले

    डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताची कुरापत; 25% टेरिफ सह लादला दंड; रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदीचे दाखविले कारण!!