• Download App
    चंद्राबाबू नायडू यांचा दावा, निवडणुकीत देशाचा मूड अतिशय चांगला, एनडीएला 400 हून अधिक जागा मिळणार|Chandrababu Naidu claims, the mood of the country is very good in the elections, NDA will get more than 400 seats

    चंद्राबाबू नायडू यांचा दावा, निवडणुकीत देशाचा मूड अतिशय चांगला, एनडीएला 400 हून अधिक जागा मिळणार

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत देशाचा मूड अतिशय चांगला आहे. एनडीएसाठी देशात अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे एनडीएला 400 हून अधिक जागा मिळणार असा विश्वास आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला आहे.Chandrababu Naidu claims, the mood of the country is very good in the elections, NDA will get more than 400 seats



    दरम्यान चंद्रबाबू नायडू पुढे बोलताना म्हणाले की, आज महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेऊन खूप आनंद झाला, देशामध्ये शांती नांदावी, या देशातील सर्वांना महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा, अशी प्रार्थना ही महालक्ष्मीच्या चरणी केली असेही त्यांनी म्हटले आहे.

    कोल्हापूर विमानतळावरून चंद्रबाबू नायडू शिर्डी येथे जाणार आहेत. दुपारी साईबाबाचे दर्शन घेऊन पुन्हा बेळगाव मार्गे हैदराबादला रवाना होणार आहे. चंद्राबाबू नायडू व भाजप यांनी संयुक्तपणे लोकसभा निवडणूक लढवली असली तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या दौऱ्याबद्दल विशेष माहिती नव्हती. माजी मुख्यमंत्री नायडू येण्यापूर्वी तासभर अगोदर पोलिसांनी दक्षिण दरवाजासमोरील येणाऱ्या भाविकांची वाट बंद केली होती. आलेल्या भाविकांनी चप्पल स्टॅन्डला काढल्यामुळे भाविकांची ही गैरसोय झाली.

    लोकसभेबरोबरच आंध्र प्रदेश मधील विधानसभा निवडणूक पार पडली. 175 विधानसभा मतदारसंघापैकी 143 विधानसभा मतदारसंघात तेलगू देशम पार्टीच्या वतीने उमेदवार उभा करण्यात आले आहेत. वाय एस आर रेड्डी यांच्या विरुद्ध त्यांचा सामना आहे. मात्र आंध्र प्रदेशच्या घडामोडीवर बोलण्यास चंद्राबाबू नायडू यांनी टाळले आहे.

    Chandrababu Naidu claims, the mood of the country is very good in the elections, NDA will get more than 400 seats

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mamata Banerjee : SIR दरम्यान अमानवीय वागणुकीविरोधात न्यायालयात जाणार; CM ममतांचा आरोप- या प्रक्रियेमुळे अनेक लोकांचा मृत्यू

    Umar Khalid : दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद – शरजीलला जामीन नाही; सुप्रीम कोर्टाची अपीलवर एक वर्षाची बंदी, 5 आरोपींना जामीन मंजूर

    Shashi Tharoor : शशी थरूर म्हणाले- मी कधीही पक्षाच्या धोरणापासून भरकटलो नाही; 17 वर्षांपासून काँग्रेसमध्ये आहे, सर्वांशी चांगले संबंध