विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत देशाचा मूड अतिशय चांगला आहे. एनडीएसाठी देशात अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे एनडीएला 400 हून अधिक जागा मिळणार असा विश्वास आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला आहे.Chandrababu Naidu claims, the mood of the country is very good in the elections, NDA will get more than 400 seats
दरम्यान चंद्रबाबू नायडू पुढे बोलताना म्हणाले की, आज महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेऊन खूप आनंद झाला, देशामध्ये शांती नांदावी, या देशातील सर्वांना महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा, अशी प्रार्थना ही महालक्ष्मीच्या चरणी केली असेही त्यांनी म्हटले आहे.
कोल्हापूर विमानतळावरून चंद्रबाबू नायडू शिर्डी येथे जाणार आहेत. दुपारी साईबाबाचे दर्शन घेऊन पुन्हा बेळगाव मार्गे हैदराबादला रवाना होणार आहे. चंद्राबाबू नायडू व भाजप यांनी संयुक्तपणे लोकसभा निवडणूक लढवली असली तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या दौऱ्याबद्दल विशेष माहिती नव्हती. माजी मुख्यमंत्री नायडू येण्यापूर्वी तासभर अगोदर पोलिसांनी दक्षिण दरवाजासमोरील येणाऱ्या भाविकांची वाट बंद केली होती. आलेल्या भाविकांनी चप्पल स्टॅन्डला काढल्यामुळे भाविकांची ही गैरसोय झाली.
लोकसभेबरोबरच आंध्र प्रदेश मधील विधानसभा निवडणूक पार पडली. 175 विधानसभा मतदारसंघापैकी 143 विधानसभा मतदारसंघात तेलगू देशम पार्टीच्या वतीने उमेदवार उभा करण्यात आले आहेत. वाय एस आर रेड्डी यांच्या विरुद्ध त्यांचा सामना आहे. मात्र आंध्र प्रदेशच्या घडामोडीवर बोलण्यास चंद्राबाबू नायडू यांनी टाळले आहे.
Chandrababu Naidu claims, the mood of the country is very good in the elections, NDA will get more than 400 seats
महत्वाच्या बातम्या
- मान्सूनचे शुभवर्तमान : IMDचा अंदाज 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचेल, महाराष्ट्रात 9 ते 16 जूनदरम्यान आगमन
- संघाचं फडकं म्हणून उद्धव ठाकरेंकडून भगव्या ध्वजाजा अपमान!!
- स्वाती मालीवाल यांच्या जबानीनंतर दिल्ली पोलिसांमध्ये FIR दाखल; त्यात बिभव कुमारचे नाव, पण केजरीवाल अद्याप गप्प!!
- मनी लाँड्रिंग प्रकरणात मंत्री आलमगीरला धक्का; कोर्टाने EDला सहा दिवसांची दिली रिमांड