वृत्तसंस्था
मोहाली : पंजाब मध्ये मोहाली येथील चंदीगड विद्यापीठात झालेल्या एमएमएस प्रकरणामुळे पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एका विद्यार्थिनीने आपल्या मैत्रिणींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे विद्यार्थिनींनी विद्यापीठात जोरदार निदर्शने केली. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात एक वेगळीच माहिती समोर येत आहे. Chandigarh University MMS The girl only sent videos of herself to her boyfriend
आरोपी तरुणीने फक्त स्वतःचेच व्हिडिओ रेकॉर्ड करुन आपल्या बॉयफ्रेंडला पाठविले असल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला असून त्यामुळे विद्यापीठाकडून सत्य लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचे पीडित तरुणींचे म्हणणे आहे.
विद्यापीठाचा दावा
चंदीगड विद्यापीठातील एका तरुणीने वसतिगृहात राहणा-या 60 विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ शूट करुन, ते आपल्या शिमला येथील बॉयफ्रेंडला पाठवले. त्यानंतर हे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थिनींनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने सुरू केली. तसेच हा धक्का सहन न झाल्यामुळे 8 विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
पोलिसांना आरोपी विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये केवळ तिचेच अश्लील व्हिडिओ सापडले असून ही विद्यार्थिनी आपले न्यूड फोटो बनवून आपल्या बॉयफ्रेंडला पाठवत होती. याशिवाय इतर कोणत्याही मुलीचा व्हिडिओ तिने बनवलेला नाही, असा दावा विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.
पोलिसांकडून तपास
या प्रकरणाची गंभीर दखल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतली असून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आरोपी विद्यार्थिनीकडे असलेला मोबाईल आणि इतर सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेतली आहेत. फॉरेन्सिक विभागाकडून या उपकरणांची तपासणी करण्यात येत आहे.
Chandigarh University MMS The girl only sent videos of herself to her boyfriend
महत्वाच्या बातम्या
- ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी : 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांत 608 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
- चंदीगड विद्यापीठातील धक्कादायक प्रकार : 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल; 8 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न
- पुढच्या मराठवाडा मुक्तिदिनापूर्वी दौलताबाद किल्ल्याचे नाव ‘देवगिरी’ करणार , पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढांची घोषणा
- नॅशनल लॉजिस्टिक्स पॉलिसी अर्थात राष्ट्रीय रसद नीती जाहीर!; तिचे महत्त्व काय?