पंजाबमध्ये नूतन मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. जेव्हापासून त्यांनी शपथ घेतली आहे, तेव्हापासून त्यांच्या काही आव्हाने येत आहेत. आता पंजाबचे मुख्यमंत्री एका नव्या वादात सापडताना दिसत आहेत. हा वाद अधिकृत बैठकीदरम्यान चन्नी यांच्या मुलाच्या उपस्थितीवरून सुरू झाला आहे. chandigarh punjab CM Charanjeet Singh Channi new headache for channi as sons presence at official meet sparks row
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंजाबमध्ये नूतन मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. जेव्हापासून त्यांनी शपथ घेतली आहे, तेव्हापासून त्यांच्या काही आव्हाने येत आहेत. आता पंजाबचे मुख्यमंत्री एका नव्या वादात सापडताना दिसत आहेत. हा वाद अधिकृत बैठकीदरम्यान चन्नी यांच्या मुलाच्या उपस्थितीवरून सुरू झाला आहे.
फोटो समोर येताच टीकेला सुरुवात
गुरुवारी पंजाबच्या डीजीपींची राज्यातील इतर अधिकारी आणि मंत्र्यांसोबत कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बैठक सुरू होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, चन्नी यांचा मुलगा रिद्मजीत सिंगदेखील या बैठकीला उपस्थित होता. सोशल मीडियावर त्याचे फोटो येताच वाद सुरू झाला आहे. भारतीय जनता पक्षाने याबाबत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. पंजाब भाजप अध्यक्ष अश्वनी शर्मा यांनी याला पूर्णपणे अनैतिक म्हटले आहे.
नियमांना हरताळ
अश्वनी शर्मा म्हणाले की, चन्नी तीन वेळा आमदार राहिले आहेत. त्यांना नियम चांगले माहीत आहेत. ते म्हणाले की, घटनात्मक नियमांचे नेहमी पालन केले पाहिजे. अश्वनी शर्मा म्हणाले की, हे दुर्दैव आहे की नियम आणि कायदे माहिती असूनही वरिष्ठ नोकरशहांनी त्यास परवानगी दिली. या बैठकीला शिक्षण, क्रीडा आणि अनिवासी भारतीय मंत्री परगट सिंह उपस्थित होते. नियमानुसार, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य किंवा अन्य कोणताही मंत्री अशा अधिकृत बैठकीला उपस्थित राहू शकत नाही.
chandigarh punjab CM Charanjeet Singh Channi new headache for channi as sons presence at official meet sparks row
महत्त्वाच्या बातम्या
- Bhawanipur By-Poll Results : मतमोजणीच्या 11 फेऱ्या पूर्ण; ममता बॅनर्जी 34 हजार मतांनी पुढे, तृणमूलकडून गुलालाची तयारी
- “खोलवर शिरून” बाॅलिवूडला खणती लावायला सुरुवात; बड्या धेंडांना नार्कोटिक्स ब्यूरो सोडणार नाही!!
- “जर मदत दिली नाही तर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही”, राजू शेट्टी यांचा इशारा्र
- Shivsena Audio clip : रामदास कदमांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी माहीत नाही, पण शिवसेनेत मोठी खदखद ; नांदेड येथे फडणवीस यांची प्रतिक्रिया
- सामंथा अक्कीनेनी- नागा चैतन्यने घेतला घटस्फोटाचा निर्णय