• Download App
    पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता ; राजस्थान, उत्तर भारतात तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळही। Chance of rain again ; Thunderstorms in rare places in Rajasthan, North India

    पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता ; राजस्थान, उत्तर भारतात तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळही

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : थंडी निघून जात असताना आणि उन्हाळ्याच्या आगमनादरम्यान देशाच्या काही भागात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या (IMD) मते, तशा प्रकारची नैसर्गिक प्रणाली दक्षिण-पश्चिम राजस्थानवर तयार होणार आहे. त्यामुळे आज राजस्थान आणि उत्तर भारताच्या काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. Chance of rain again ; Thunderstorms in rare places in Rajasthan, North India

    विभागाचे म्हणणे आहे की, नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे २ मार्च रोजी देशातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीच्या काही विखुरलेल्या भागांमध्ये गडगडाटी वादळाची शक्यता आहे.



    राजधानी दिल्लीतही आज पावसाची शक्यता आहे. येथे दिवसभर ढगाळ वातावरण राहील. काही भागात हलका पाऊस अपेक्षित आहे. उत्तर प्रदेशातील अनेक भागात येत्या काही दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    लखनौचे किमान तापमान १३अंश सेल्सिअस आणि कमाल २९ अंश सेल्सिअस असू शकते. त्याच वेळी, चंदीगडचे किमान तापमान ११ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

    Chance of rain again ; Thunderstorms in rare places in Rajasthan, North India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण

    Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला

    Rahul Gandhi : यूपी निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे दावे फेटाळले; कर्नाटक आयोगाने म्हटले- राहुल यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे