येत्या दहा दिवसांत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन ( Champai Soren ) यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांना मंगळवारी पूर्णविराम मिळाला.
चंपाई सोरेन यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा केली असून येत्या दहा दिवसांत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. रांचीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा रांचीमध्ये चंपाई सोरेनचा भाजपमध्ये समावेश करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. चंपाई सोरेन दिल्लीत असून आज ते झारखंडला रवाना होणार आहेत.
रविवारी चंपाई सोरेन यांनी X वर पोस्ट करून JMM बद्दलच्या नाराजीचे कारण स्पष्ट केले होते. यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चाही जोर धरू लागली आहे.
Champai Soren will join BJP
महत्वाच्या बातम्या
- Eknath shinde : मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता
- Narendra modi :पंतप्रधान मोदी जगाला चकित करणार, रशियानंतर आता थेट युक्रेनला जाणार!
- Monkey Pox Principal Secretary : ‘मंकी पॉक्स’बाबत मोठी बैठक, प्रधान सचिव म्हणाले परिस्थितीवर पंतप्रधानांची नजर!
- Vishwa Hindu Parishad : मागासवर्गीयांना आपलेसे करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेची देशभरात तब्बल 9000 ब्लॉक मध्ये धर्मसभा आणि संमेलने!!