विशेष प्रतिनिधी
रांची : झारखंड मधील जमीन आणि खाण घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर चौकशी आणि तपासाचा दोर आवळल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडले. इतकेच नाही, तर राज्यात मोठा उलटफेअर होऊन हेमंत सोरेन यांना आपली पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्याची बनवण्याचा मनसूबा सोडून द्यावा लागला. Champai Soren new chief minister of jharkhand
इतकेच नाही, तर झारखंड पोलीस आणि ईडीच्या अधिकाऱ्यांसह राजभवनात जाऊन त्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यापूर्वी झारखंड मुक्ती मोर्चाच्या विधिमंडळ नेतेपदी सर्वात ज्येष्ठ मंत्री म्हणून चंपई सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी निवड करावी लागली.
झारखंड मध्ये आजचा 31 जानेवारीचा दिवस प्रचंड खळबळजनक घडामोडींचा ठरला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री निवासात जाऊन हेमंत सोरेन यांची तब्बल 9 तास चौकशी आणि तपास केला. अखेरीस त्यांना आपल्या समवेत घेऊन झारखंडचे राजभवन गाठले. तेथे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण दरम्यानच्या काळात हेमंत सोरेन यांनी जो विचार केला होता की आपण मुख्यमंत्रीपदावर टिकून राहणार नसू, तर आपल्या जागी आपली पत्नी कल्पना सोरेन हिची मुख्यमंत्री पदावर निवड करावी, तो विचारही हेमंत सोरेन यांना सोडून द्यावा लागला. झारखंड मुक्ती मोर्चाच्या विधिमंडळ नेतेपदी ज्येष्ठ मंत्री म्हणून चंपई सोरेन यांची मुख्यमंत्री पदावर निवड करावी लागली.
– कोण आहेत चंपई सोरेन?
चंपई सोरेन हे 2005 पासून झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष असून त्यांनी शिबू सोरेन यांच्या मंत्रिमंडळासह हेमंत सोरेन यांच्याही मंत्रिमंडळात काम केले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून चंपई सोरेन यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालावी. कल्पना सोरेन यांना राज्याचे राजकारण हाताळता येणे कठीण आहे, हे हेमंत सोरेन यांच्या गळी उतरवले. त्यामुळेच नाईलाज म्हणून हेमंत सोरेन यांना आपल्या पत्नीला मुख्यमंत्री करता आले नाही. तिच्या ऐवजी चंपई सोरेन यांची मुख्यमंत्री पदावर निवड करावी लागली.
Champai Soren new chief minister of jharkhand
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल म्हणाले- भाजप ट्रम्पप्रमाणे सत्तेला चिकटून राहणार; लोकसभेत हरल्यानंतरही जागा सोडणार नाही
- मद्रास हायकोर्टाचा आदेश- मंदिर हे पिकनिक स्पॉट नाही; बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी, मंदिराच्या गेटवर नो एन्ट्री बोर्ड लावण्याचे निर्देश
- INDI आघाडी बंगालमध्ये ममतांनी तोडली; केरळात डाव्यांनी फोडली; उत्तर प्रदेशात अखिलेशने मोडली!!
- जियोची केंद्र