• Download App
    Champai Soren and Hemant Soren फक्त चंपई सोरेनच का, हेमंत सोरेन यांनी देखील भाजपमध्ये सामील व्हावे

    Champai Soren and Hemant Soren : फक्त चंपई सोरेनच का, हेमंत सोरेन यांनी देखील भाजपमध्ये सामील व्हावे!!; हेमंत विश्वशर्मांनी का दिले निमंत्रण??

    विशेष प्रतिनिधी

    रांची : Champai Soren and Hemant Soren फक्त झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेनच का, विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील भाजपमध्ये सामील व्हावे, असे निमंत्रण आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंडचे भाजप प्रभारी हेमंत विश्वशर्मा यांनी देऊन झारखंड आणि भाजपच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. पण मूळात हेमंत विश्वशर्मा यांनी असे निमंत्रण दिलेच का??, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.Champai Soren and Hemant Soren to join BJP says Assam CM Sarma

    त्याचे झाले असे :

    झारखंड मधील खाण घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीच्या कोठडीत जावे लागल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांनी आपल्या जागी चंपई सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली परंतु दरम्यानच्या काळात हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची पुन्हा शपथ घेतली. चंपई सोरेन यांना बाजूला केले त्यामुळे चंपई सोरेन दुखावले. त्यांनी काही दिवस वाट पाहिली आणि नंतर बंडाचा झेंडा फडकवला. ते झारखंड मुक्ती मोर्चातून बाहेर पडले. त्यांची भाजपमध्ये येण्याची चर्चा सुरू झाली, पण त्यासाठी काही आमदार घेऊन येण्याची त्यांच्यासमोर ठेवण्यात आल्याची बातमी आली. पण तेवढे आमदार त्यांना जमवता आले नाहीत त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश लटकता राहिला.


    विधानसभेसाठी पवारांचा ताटातलं वाटीतचा जुनाच फॉर्म्युला; भाजपचा “असाइनमेंट” आणि पंचायत गटांवर फोकसचा फॉर्म्युला!!


    दरम्यानच्या काळात झारखंडमध्ये दोन सोरेनमध्ये झुंज लागल्याचे चित्र निर्माण झाले. त्याचा लाभ भाजप उठवत असल्याची चर्चा सुरू झाली.

    या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे झारखंड प्रभारी हेमंत विश्व शर्मा आज रांचीत पोहोचले. रांचीत पोहोचताच त्यांनी चंपई सोरेन आणि हेमंत यांनाच भाजप प्रवेशाचे निमंत्रण देऊन टाकले. पण त्याचे कारण मात्र त्यांनी पूर्णपणे वेगळे सांगितले. झारखंडमध्ये सध्या सगळ्यात मोठी समस्या बांगलादेशी घुसखोरांची आहे. या घुसखोरांनी झारखंडला विळखा घातला आहे. तो सोडवायचा असेल तर सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्यामुळेच आपण चंपई सोरेन आणि हेमंत सोरेन या दोघांनाही भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण देत आहोत, झारखंड मधल्या दोन शक्ती एकवटल्या, तर घुसखोरांच्या समस्येवर प्रभावीपणे तोडगा काढता येईल, असे हेमंत विश्वशर्मा म्हणाले.

    झारखंड मुक्ती मोर्चाचा मित्र पक्ष काँग्रेसने हिंदू समाजात फूट पाडून राजकारणाची पोळी भाजायचे ठरवले आहे. काँग्रेसच्या सरकारांनी कर्नाटक आणि बिहारमध्ये जातनिहाय सर्वेक्षण केले, पण त्याचे निष्कर्ष जाहीर केले नाहीत. काँग्रेसची जातनिहाय जनगणनेच्या संदर्भातली ही दुटप्पी भूमिका आहे हे झारखंड मुक्ती मोर्चाने ओळखावे, असा इशाराही हेमंत विश्वशर्मा यांनी दिला.

    Champai Soren and Hemant Soren to join BJP says Assam CM Sarma

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली