• Download App
    Chandrayaan-3 : ''... म्हणून संसदेने ठराव करून चंद्राला हिंदू राष्ट्र आणि 'शिवशक्ती पॉईंट' राजधानी बनवावे'' स्वामी चक्रपाणी महाराज यांची मागणी! Chakrapani Maharaj demanded that Moon Should be made a Hindu nation and  Shiva Shakti Point the capital

    Chandrayaan-3 : ”… म्हणून संसदेने ठराव करून चंद्राला हिंदू राष्ट्र आणि ‘शिवशक्ती पॉईंट’ राजधानी बनवावे” स्वामी चक्रपाणी महाराज यांची मागणी!

    जाणून घ्या,  अशी मागणी  का केली आहे आणि त्यांचे नेमके काय म्हणणे आहे?

    विशेष प्रतिनिधी

    चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर संपूर्ण जग भारताच्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरकडून येणाऱ्या माहितीची आतुरतेने वाट पाहत आहे. तर दुसरीकडे  चंद्राबाबत एक अजब  मागणी समोर आली आहे.  अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष  चक्रपाणी महाराज  यांनी दुसरा कोणताही देश आपला हक्का सांगणया अगोदर चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करावे, अशी मागणी केली आहे.  Chakrapani Maharaj demanded that Moon Should be made a Hindu nation and  Shiva Shakti Point the capital

    चंद्रयान-3 च्या लँडिंग साइटला शिवशक्ती पॉइंट असे नाव दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो, असा व्हिडिओ संदेश त्यांनी जारी केला. ते पुढे म्हणाले की, मला असे वाटते की इतर कोणत्याही विचारसरणीच्या लोकांनी किंवा इतर देशातील लोकांनी तेथे जाऊन गजवा-ए-हिंद बनवू नये, म्हणून संसदेने ठराव मंजूर करून चंद्राला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावे. तिथे जाऊन राजधानी शिवशक्ती पॉइंट बनवावी.

    चक्रपाणी महाराज पुढे म्हणाले की, कोणी अन्य  चंद्रावर जाऊन जिहाद करण्यापूर्वी, कट्टरतावादी विचारसरणीचा प्रसार करण्यापूर्वी, दहशतवाद पसरवण्या अगोदर आपण चंंद्राला  एक हिंदू सनातन  राष्ट्र म्हणून घोषित करावे. एवढंच नाही तर ते म्हणाले की त्याची राजधानी शिवशक्ती पॉइंट असावी, कारण चंद्र भगवान शंकराच्या मस्तकावर बसला आहे. तसेच हिंदू सनातन्यांचे चंदामामाशी जुने नाते आहे. ते म्हणाले की, आपल्या धर्मग्रंथांमध्ये चंद्राचे अनेक संदर्भ आहेत. चंद्राची शुद्धता आणि पावित्र्य राखले जावे असे मला वाटते. त्यामुळेच प्रस्ताव आणून चंद्राला हिंदु सनातन राष्ट्र म्हणून घोषित करावे.

    Chakrapani Maharaj demanded that Moon Should be made a Hindu nation and  Shiva Shakti Point the capital

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Apple : अ‍ॅपलचे बाजारमूल्य पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्स पार; हे भारताच्या जीडीपीच्या बरोबर

    Siddaramaiah : सरकारी ठिकाणी RSS शाखा, बंदीच्या आदेशाला स्थगिती; कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सिद्धरामय्या सरकार खंडपीठात आव्हान देणार

    Delhi Police : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला दिल्लीतून अटक; अनेक वर्षांपासून गुप्तचर माहिती पाठवत होता